Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली होती, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. तेवढेच संख्याबळ कायम ठेवत शिंदे सरकारने सोमवारी विश्वास दर्शक ठ ...
औट घटकेचे मुख्यमंत्री, गत सरकारमधील विरोधी पक्षनेते व सद्य स्थितीत सहा महिन्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यवती निवडणुका होतील, असे सूचक विधान केल्यावर संजय राऊत यांनीही री ओढली आहे. ...