राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ...
नाशिक येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्व कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहोत. जोपर्यंत डंके की चोट पर विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत स्टिअरिंग हातात घेणार नाही, बसची घंटी वाजणार नाही. ऑईल बदली होणार नाही. ...
आमदार पडळकर आणि खोत यांनी गेल्या 15 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन लावून धरले होते. आझाद मैदानात ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले, तसेच मैदानावरच झोपेल. ...