लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

डॉ पुरुषोत्तम राजिमवाले, फोटो

Dr purushottam rajimwale, Latest Marathi News

डॉ. पुरुषोत्तम हे राजिमवाले कुटुंबातील सदस्य आहेत. हे कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. डॉ. पुरुषोत्तम हे शिवपुरी अक्कलकोटचे परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, ज्यांना त्यांचे जगभरातील भक्तगण श्री या नावाने संबोधतात. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत.  श्रींनी अकालकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि उपचार,शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. डॉ. पुरुषोत्तम यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. श्री व त्यांचे वडील श्री श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली.  समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.श्री श्रीकांतजी महाराज ज्यांनी संस्कृतमध्ये पी एचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती, ते डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडून तासनतास धडे गिरवून घेत. त्यांच्या शिकवणीत ते आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.  
Read More