देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करुन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची पुन: जबाबदारी सोपविली आहे. ...
राज्यात २०१९ला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस गावोगावी मेळावे घेत निवडणुकीचे वातावरण तापवत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे तालुकास्तरावर बैठकांची मालिका सुरू आहे. ...
राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा हाती घेतल्यापासून अनेक बदल होत आहेत. काँग्रेस पक्षांतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यातील मार्ग ठरवण्यावरूनच प्रदेशच्या नेत्यांसमोरच दोन पदाधिकाºयांनी या मतभेदांचे दर्शन घडवले. ...