देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. फैजपूर, भुसावळ व बोदवड येथे सभांचेही आयोजन करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी व बळीराजाच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासह सर्वसामान्यांसह राज्यापुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्र मक भूमिका घेतली आहे. ...