देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल ...
आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कामगिरीपेक्षाही आमच्या सरकारची चार वर्षांतील कामगिरी कितीतरी दमदार असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतची आकडेवारीच सादर केली. ...
मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले ...