लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 01:06 IST2026-05-10T01:05:10+5:302026-05-10T01:06:43+5:30

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

BJP leader shot in Lucknow condition critical Activists throng outside trauma center | लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील बाजार खाला पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांनी एका भाजप नेत्यावर फायरींग केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) नेते चेतन गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी भाजप युवा मोर्चाचे नेते चेतन यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या कंबरेला दोन गोळ्या लागल्याने, ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. यानंतर, त्यांना तातडीने लखनौच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांचे पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. 

सत्ताधारी पक्षाच्या युवा नेत्यावर झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपचे अनेक मोठे नेते तसेच कार्यकर्त्यांनी ट्रामा सेंटरबाहेर मोठी गर्दी केली आहे. रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे 'जुने वैमनस्य असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी हा हल्ला का केला? याची अधिकृत पुष्टी पोलीस तपासानंतरच होईल. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, हल्लेखोरांना शोधण्यासाठी पथकेही रवाना करण्यात आली आहेत.

 

Web Title : लखनऊ में बीजेपी नेता पर गोलीबारी, हालत गंभीर; ट्रॉमा सेंटर पर कार्यकर्ताओं की भीड़

Web Summary : लखनऊ में बीजेपी नेता चेतन पर हमला, हालत गंभीर। ट्रॉमा सेंटर पर कार्यकर्ताओं की भीड़ जमा। पुलिस जांच कर रही है, पुराने दुश्मनी की आशंका। इलाके में तनाव व्याप्त।

Web Title : BJP Leader Shot in Lucknow, Critical; Supporters Gather at Trauma Center

Web Summary : A BJP leader, Chetan, was shot in Lucknow, leaving him critically injured. He is hospitalized, and tensions are high as supporters gather outside the trauma center. Police are investigating the attack, suspecting old rivalries as a motive.