अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 23:01 IST2026-05-09T23:01:27+5:302026-05-09T23:01:51+5:30

आपल्या पहिल्याच निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकण्याचा पराक्रम केला...

Finally, the dilemma is solved! 'TVK' chief Joseph Vijay will take oath as Chief Minister tomorrow; This is how the majority mark was reached | अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा

अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा

तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला आहे. अभिनेता ते नेता बनलेले 'जोसेफ विजय चंद्रशेखर' अर्थात 'थलापती विजय' राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी शनिवारी 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) प्रमुख जोसेफ विजय यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ विजय हे रविवारी सकाळी १० वाजता शपथ घेतील.

संपूर्ण गणित, असा गाठला बहुमताचा आकडा - 
व्हीसीके (VCK) आणि आययूएमएल (IUML) या पक्षांनी विजय यांच्या टीव्हीकेला 'बिनशर्त पाठिंबा' जाहीर केला. यानंतर २३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा टीव्हीकेने पार केला. थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील विदुथलाई चिरुथाइगल काची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) यांचे प्रत्येकी २ आमदार आहेत. यापूर्वी माकपा आणि भाकपा या डाव्या पक्षांनीही जोसेफ विजय यांना पाठिंबा दिला होता. यांचेही प्रत्येकी २-२ आमदार आहेत. याशिवाय, काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या मदतीने आता विजय यांच्याकडे १२१ आमदारांचे संख्याबळ आहे. 

बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता -
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. आपल्या पहिल्याच निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकण्याचा पराक्रम केला. तांत्रिकदृष्ट्या विजय यांनी दोन जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. यामुळे पक्षाचे संख्याबळ १०७ होईल. मात्र, आता पाच मित्रपक्षांच्या १३ आमदारांनी पाठिंबा दिल्याने युतीचे एकूण संख्याबळ १२१ वर पोहोचले आहे. जे बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक आहे.

 

Web Title : जोसेफ विजय होंगे तमिलनाडु के मुख्यमंत्री, बहुमत हासिल!

Web Summary : अभिनेता जोसेफ विजय तमिलनाडु के अगले मुख्यमंत्री होंगे। वीसीके, आईयूएमएल और वाम दलों के समर्थन से टीवीके ने बहुमत हासिल किया, और 234 सदस्यीय विधानसभा में 121 सीटें प्राप्त कीं। रविवार सुबह 10 बजे शपथ ग्रहण करेंगे।

Web Title : Joseph Vijay to be Tamil Nadu CM, Secures Majority!

Web Summary : Actor Joseph Vijay will be Tamil Nadu's next CM. TVK secured majority with support from VCK, IUML, and left parties, reaching 121 seats in the 234-member assembly. He will be sworn in on Sunday at 10 AM.