पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 23:49 IST2026-05-09T23:49:24+5:302026-05-09T23:49:38+5:30

पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. तेही २०७ जागांच्या प्रचंड बहुमतासह. शुवेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.

Mamata Banerjee's TMC announces Leader of Opposition in West Bengal, who got the responsibility | पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?

पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांची दीड दशकांची सत्ता संपुष्टात आणल्यानंतर, आता तृणमूल काँग्रेसने (TMC) विरोधी बाकांवर बसण्याची तयारी सुरू केली आहे. आज टीएमसीने विधानसभेसाठी आपल्या विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय हे पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. तसेच, असीमा पात्रा आणि नैना बंद्योपाध्याय, या विधानसभेत विरोधी पक्षाच्या उपनेत्या असतील. याशिवाय, फिरहाद हकीम यांना चीफ व्हिप करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. तेही २०७ जागांच्या प्रचंड बहुमतासह. शुवेंदू अधिकारी आता राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांंनी ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला.

४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, २९४ जागांच्या विधानसभेत भाजपला २०७, तृणमूल काँग्रेसला ८०, काँग्रेसला २, हुमायूं कबीर यांच्या पक्षाला २, तर माकप आणि एआयएसएफला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. ममता बॅनर्जी २०११ पासून सत्तेवर होत्या. जी या निकालानंतर संपुष्टात आली आहे.

"भाजप विरोधात एकत्र या" - 
या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपचा सामना करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केवळ राजकीय पक्षच नव्हे, तर विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. "डाव्यांपासून ते जहाल डाव्यांपर्यंत सर्वच विरोधी पक्षांनी आता भाजप विरोधात एकत्र यायला हवे," असे आवाहन माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

 

Web Title : पश्चिम बंगाल: टीएमसी ने विपक्ष नेता की घोषणा की; किसे मिली जिम्मेदारी?

Web Summary : पश्चिम बंगाल में टीएमसी की हार के बाद, शोभनदेव चट्टोपाध्याय विपक्ष नेता बने। असीमा पात्रा और नैना बंद्योपाध्याय उपनेता होंगी। फिरहाद हकीम चीफ व्हिप बने, बीजेपी सरकार बनाएगी।

Web Title : TMC Announces Opposition Leader in West Bengal; Who Got Responsibility?

Web Summary : Following TMC's defeat in West Bengal, Shobhandev Chattopadhyay is named opposition leader. Asima Patra and Naina Bandyopadhyay will serve as deputy leaders. Firhad Hakim becomes chief whip, as BJP forms government.