देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. ...
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेने २०१४ मध्येच दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. ...
काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा भोईर यांनी भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांना मतदान केल्याप्रकरणी नंदू म्हात्रे यांची काँग्रेसच्या गटनेते पदावरून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हकालपट्टी केली आहे. ...
भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
आता सिब्बल यांच्यानंतर खुर्शीद यांनीही हेच मत मांडले आहे. तर विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA लागू न करण्यावर ठाम आहे. मात्र सिब्बल आणि खुर्शीद यांनी दावा केल्याप्रमाणे खरं असेल तर देशात सर्व राज्यात CAA लागू होईल अशी शक्यता आहे. ...