देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कार्यकर्त्यांनी आवाज वाढवल्याने काही वेळ वातावरण तापले. माणिकराव ठाकरे यांना भेटून भावना कळवतो, असे सांगून प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. ...
थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत. यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा टोला दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ...
DK Shivakumar: मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर मला सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही. कारण पक्षातील चार-पाच लोकांमध्येच एक सीक्रेट डील झाली होती, असे डीके शिवकुमार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. ...