भिवंडीतून साडे तीन वर्षांपूर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीवर नेपाळमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आले. तिच्याशी जबरदस्तीने विवाह करणारा अशोक यादव आणि त्याच्या भावाला ठाणे पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मंगळवारच्या विशेष महासभेत प्रति १ हजार लीटर पाणीपुरवठ्याच्या निवासी दरात ३ रुपये तर व्यावसायिक दरात १० रुपये वाढ करण्यास मान्यता दिली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत सत्ताधारी भाजपाने मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला बहुमताने मान्यता दिल्याविरोधात सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवित सभागृहात थाळीनाद केला. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले. ...
घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे घडली. ...
आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी एका मालगाडीचे इंजिन बंद पडले, त्यामुळे डाऊन मार्गावरून कसा-याला जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यापाठोपाठ ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली स्थानकादरम्यान 5 वाजून 40 मिनिटांनी एक ...
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८च्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मांडले. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकल मधील डब्यातील आसनव्यवस्था बदललेल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणा-या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे ...
महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिव ...
कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी आदी शाखेचे ९२ हजार ९४४ विद्यार्थ्यांचा इंग्रजी हा पहिला पेपर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे. ...