महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून आगपाखड केल्याने त्याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांनी महासभेलाच दांडी मारली होती. यावेळी केवळ ३५ (अ) चे विषय मंजूर करण्यात आले होते. परंतु, आता हे विषयदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच ...
- पंकज रोडेकरठाणे : मोबाइलचोरीची सुसाट लोकल गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत आहे. त्यातच, लोहमार्ग पोलिसांनी या घटनांना आळा बसवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातूनच, पोलीस तपासात स्मार्ट फोनपूर्वीचे हस्त ...
राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आ ...
‘भावली धरण’ नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या जंगल परिसरात असून ते जलसंपदा विभागाचे आहे. शेती सिंचनासाठी असलेल्या या धरणातील १२.६९ दशलक्ष घनमीटर पाणी शहापूरच्या टंचाईग्रस्त आरक्षित करण्यात आले. सिंचनासाठीच्या प्रकल्पातून बिगर सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवल ...
हवेतून पसरणारा क्षयरोग हा संसर्गजन्य आजार भारतातील सामाजिक आरोग्याचा एक ज्वलंत प्रश्न झाला आहे. संपूर्ण जगातील टीबी रुग्णांपैकी साधारण २०% (एक पंचमांश) रुग्ण भारतात आहेत. ...
शेअर्सच्या व्यवसायात सुमारे ३६ लाखांच्या झालेल्या नुकसानीस गुंतवणूकदाराने संबंधित शेअर ब्रोकरला जबाबदार धरले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या ब्रोकरविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
जिल्ह्यातील महापालिका, एमआयडीसी, टेमघर, एमजेपी आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनी मंजूर कोट्यापेक्षा जास्त म्हणजे ६५ टक्के पाण्याची चोरी सुरू ठेवल्याने १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आलेली नाही. ...
महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे-३ या विभागातील मुंब्रा-शीळ या भागात महावितरणने धडक कारवाई करून मागील आठ महिन्यांत १३६४ वीजचोºया पकडून एक कोटी ९५ लाख रुपये वसूल केले आहेत. ...