शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यात हर्बलच्या नावाखाली भांगेच्या गाेळयांची तस्करी करणारी १६ जणांची टाेळी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: September 4, 2024 21:10 IST

राज्य उत्पादन शुल्कचा छापा: यूपीतून मुंबईच्या बांद्रा टमिर्नल भागातून  १६ ठिकाणी वितरण

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हर्बल आयुर्वेदिक गाेळयांच्या नावाखाली भांग मिश्रीत अमली पदार्थाच्या गाेळयांची रेल्वेतून तस्करी करणाऱ्या अकवर हसन इक्बाल हसन खान या सूत्रधारासह १६ जणांच्या टाेळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चार पथकांनी जेरबंद केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. या टाेळीकडून आठ वाहनांसह उत्तरप्रदेशात बनविण्यात आलेला भाग मिश्रीत पदार्थाचा यामध्ये पाच लाख ३९ हजारांचा ४३५ किलाेग्रॅम गांजा तसेच आठ वाहनांसह ४२ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महाकाल मुनकावटी या नावाने हर्बल आयुर्वेदिक गाेळयांच्या नावाखाली उत्तरप्रदेशात बनविण्यात आलेल्या भांग मिश्रीत अमली पदार्थाच्या गाेळयांची मुंबईतील बांद्रा रेल्वे जंक्शन येथून मुंबईतील खेरवाडी तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण डाेंबिवली भागात माेठया प्रमाणात विक्री हाेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली हाेती. त्याच आधारे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर २०२४ राेजी मुंबईतील बांद्रा रेल्वे जंक्शन भागात काेकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह चार पथकांनी सापळा लावला.

याच धाडसत्रात तीन टेम्पाेमधून भांगेच्या या गाेळयांचा साठा हस्तगत केला. यामध्ये शेख याच्यासह सहा जणाना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याच चाैकशीमध्ये यातील सूत्रधार अकबर खान याला अटक करुन त्याच्याकडूनही यातील काही साठा हस्तगत केला. त्यानंतर अन्य एका पथकाने िभवंडीत छापा टाकून भरत चौधरी अटक केली. तिसऱ्या पथकाने ठाण्यातील मानपाडा भागातून गणाराम चौधरी आणि विजेशकुमार गुप्ता यांच्याकडूनही काही साठा हस्तगत केला. पुढील चाैकशीमध्ये चाैथ्या पथकाने मुंबईच्या बाेरीवली भागातून सचिन गौड, शुभम चौरसिया यांनाही अटक केली. त्याच्या चाैकशीमध्ये आणखी तिघांना मुंबईतूनच अटक केली. त्यानंतर ३ सप्टेंबर राेजी मुंब्रा भागात छापा टाकून सुदर्शन यादव याची धरपकड करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस