शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 10:20 IST

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

- शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील प्रसाद देठे(वय 38) यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

तुळजापुर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे सेवेकरी म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली होती. लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

देठे हे नोकरीनिमित्त ते पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते. त्यांचे आई वडील हयात नाहीत. एक भाऊ महेश आणि त्यांचे कुटुंब बार्शीतील राहतात. त्यांचा पश्चात एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. काल ओबीसी- मराठा आरक्षणाचा होत असलेला संघर्ष पाहून अत्यंत भावनिक होऊन देठे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान म्हणून आपला जीव दिल्याचे म्हटले जात आहे.

प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जयोस्तु मराठामराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला.  हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे.  धीट रहा. 

मला माफ करा. तुमचाच प्रसाद

13 मे फेसबुक कविता पोस्ट पिन करून ठेवली होती

मृत्यू एक सखा

मनाच्या कोपऱ्यातदडून असतो मृत्यूकाहीच वैर नसतंतरी भासतो शत्रू

कधीच न पाहीलेलाकाळपुरुष दिसतोशेजारचे दार ठोठावलेतरी मी टरकतो

मीच वैर जपतोइथे तिथे लपतोनेहमी झिडकारलेतरी तो जीव लावतो

जगणं जरी छळतंतरी कुठं कळतंमन याच्या भयानंदूर दूर पळतं

देहाचा खुळखुळाहोतो जेव्हा नादहीनवाट बघत असतोएक मित्र नवीन

आवाज न करतायेतो मज जवळआश्वासक हातघालतो कवळ

शेवटची फेसबुक पोस्ट आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद यांनी फेसबुक वर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात पाच सहा पोस्ट शेअर केल्या आहेत.

जयोस्तु मराठा जरांगे पाटील जिंदाबादलाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणी मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील.   एकच मिशन मराठा आरक्षण  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSolapurसोलापूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील