शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक बंड्या आरेकर यांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:40 IST

वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक, वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी देवेंद्र उर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (५८) हे शनिवारी येथील कॅम्प परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देवेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक बंड्या आरेकर यांचा अपघातात मृत्यूकर्मचाऱ्याच्या निधनाने महोत्सवावर सावट

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक, वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी देवेंद्र उर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (५८) हे शनिवारी येथील कॅम्प परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.

आरेकर हे गेली अनेक वर्षे नगरपरिषदेच्या वाहनांवर चालक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कॅम्प-म्हाडा मार्ग येथून महोत्सवाच्या दिशेने जात असताना नगरपरिषद मॉल इमारतीच्या परिसरात त्यांची दुचाकी व ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला.

या अपघातात आरेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, बहीण, वहिनी, पुतणी असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहन चालक गौरव आरेकर यांचे ते वडील होत. बंड्या आरेकर यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

१८ जानेवारीपासून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचारी हे या महोत्सवात गुंतले असतानाच नगरपरिषदेच्या कर्मचाºयाचे आकस्मिक निधन झाल्याने या महोत्सवावर दु:खाचे सावट पसरले आहे.

उसप येथे वृद्धेचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू

दोडामार्ग : तालुक्यातील उसप^-धुरीवाडा येथे बोअरिंग खोदणाऱ्या ट्रॅक्टरने वयोवृद्ध महिलेला पंधरा फूट फरफटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेला गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी नेत असताना तिचे वाटेतच निधन झाले. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाºया ट्रॅक्टर चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोडामार्ग येथून जवळच असलेल्या उसप-धुरीवाडा येथे रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुसाट वेगाने जाणाºया एका बोअरिंग खोदकाम करणाऱ्या राजस्थान येथील ट्रॅक्टरने मांजर शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या चंद्रावती वासुदेव धुरी (७४) हिला पंधरा फूट फरफफट नेले. या अपघातात ती गंभीर झाली.

तिला दोडामार्ग येथील रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना तिचे वाटेतच निधन झाले. या ट्रॅक्टरला नंबर तसेच कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. अपघाताची पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.
 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग