शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू, कसबा वाघोटण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:41 AM

देवगड तालुक्यातील कसबा वाघोटण येथे वाघोटण खाडीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या १५ वर्षीय हर्षद घाडी या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली.

ठळक मुद्देविजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यूकसबा वाघोटण येथील घटना

देवगड : देवगड तालुक्यातील कसबा वाघोटण येथे वाघोटण खाडीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या १५ वर्षीय हर्षद घाडी या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा वाघोटण येथील हमीद अली बोरकर (७०) यांचा आपल्या घराच्या मागील बाजूला चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. वाघोटण येथील हर्षद प्रभाकर घाडी हा नेहमीप्रमाणे वाघोटण खाडी येथे खेकडे पकडण्यासाठी लागणारे कोंबडीचे आतडे आणण्यासाठी दुपारी चिकन सेंटरकडे गेला होता. बोरकर यांनी आपल्या कोंबड्यांची चोरी होत असल्याने कोंबड्यांच्या खुराड्याला (लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याला) विद्युत प्रवाह जोडला होता.हर्षद हा दुपारी कोंबडीचे आतडे आणण्यासाठी तेथे गेला असता त्याचा अचानक तोल गेल्याने कोंबडीच्या लोखंडी पिंजऱ्यावर तो पडला. यावेळी त्याला विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच वाघोटण सरपंच कृष्णा आमलोसकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या घटनेची माहिती हर्षदचे वडील प्रभाकर गणपत घाडी यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली.घटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, हवालदार राजन जाधव, सुदेश तांबे, किरण कदम, कांबळे, जाधव यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला. मात्र उशिरापर्यंत विजयदुर्ग पोलीस स्थानकात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग