कलमठ बिडयेवाडी येथे चार बंद बंगले फोडले; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद

By सुधीर राणे | Updated: June 4, 2025 13:17 IST2025-06-04T13:15:56+5:302025-06-04T13:17:05+5:30

कणकवली : कणकवली शहरालगत कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडत चोरट्याने दागिने तसेच रोख रक्कम असा पावणेदोन लाखांचा ...

Four closed bungalows were broken into at Kalmath Bidayewadi Sindhudurg, thief caught on CCTV camera | कलमठ बिडयेवाडी येथे चार बंद बंगले फोडले; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद

कलमठ बिडयेवाडी येथे चार बंद बंगले फोडले; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद

कणकवली: कणकवली शहरालगत कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडत चोरट्याने दागिने तसेच रोख रक्कम असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. सोमवारी (दि.२) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तर एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरीच्या घटनेमुळे कणकवली परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कलमठ, बिडयेवाडी येथील संजय सुभाष सावंत यांचा बंद बंगला चोरट्याने फोडला आहे. संजय सावंत यांचा मुलगा अद्वैत हा पुणे येथे शिक्षणासाठी असतो. त्याला सोडण्यासाठी ते पुण्याला गेले होते. हीच संधी साधत चोरट्याने बंद बंगला फोडला. २ जून रोजी सकाळी शेजारील महिलेने सावंत यांना फोन करून त्यांच्या बंगल्याचे कुलूप फोडल्याचे सांगितले. सावंत यांनी पुणे येथून कलमठ येथे आल्यावर पाहिले सोन्याचे दागिने, चांदीचे पैजण व रोख रक्कम १५ हजार रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. 

तसेच राजाराम बाळाजी देसाई,  सुभाष दिनकर नाईक यांचे घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयाने चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या घरातील कोणतीही वस्तु चोरीस गेलेली नाही. तसेच माधव शंकर ढेकणे यांच्या घरातील रोख रक्कम ६००० रुपये व चांदीचे वाळे, चांदीची कंबर साखळी असे दागिने चोरले आहेत. एकुण १,७३,७००रुपयांचा मुद्देमाल या चोरीत लंपास केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करीत आहेत.

Web Title: Four closed bungalows were broken into at Kalmath Bidayewadi Sindhudurg, thief caught on CCTV camera