Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:38 IST2025-10-24T13:33:49+5:302025-10-24T13:38:07+5:30
महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या

Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
फलटण: फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
साताऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने काल रात्री आत्महत्या केली. पोलिस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलिस प्रशांत बनकर हे दोन पोलीस अधिकारी माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे तिने हातावर नमूद केले नमूद आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा, असे आदेश दिले आहेत. यामुळे आता याप्रकरणाच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
वाचा : महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली?
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी देखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी महिला डॉक्टर यांनी पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
वाचा : चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
पीडित डॉक्टर यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला पीएसआय गोपाल बदने आणि पोलिस प्रशांत बनकर हे दोन पोलिस अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. अखेर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल
याप्रकरणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातारा पोलिस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल. जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल, असे मंत्री भोयर यांनी सांगितले