सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:36 IST2026-03-18T15:34:18+5:302026-03-18T15:36:36+5:30

अखेरच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी 

Ajit Pawar faction splits in Sangli ZP president election, Sanjaykaka Patil supporters vote for BJP | सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान

सांगली जि.प. अध्यक्ष निवडीत अजित पवार गटात फूट, संजयकाका पाटील समर्थकांनी भाजपला केलं मतदान

दत्ता पाटील

तासगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही काळापासून भाजपपासून अंतर राखून असलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले.

संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक, मणेराजुरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. या निर्णयामुळे संजयकाका पाटील पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार गटातील नेत्यांच्यात मतभेद
 
या निवडणुकीत सत्तेच्या समीकरणांना धक्का बसला तो अजित पवार गटातील फुटीमुळे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांमध्ये उभी फूट पडल्याचे मतदानावेळी दिसून आले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सुरुवातीपासूनच अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांच्यात मतभेद पहायला मिळत होते. हे मतभेद निवडीच्यावेळी देखील पहायला मिळाले. 

वाचा: जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा

अखेरच्या क्षणी भाजपशी हातमिळवणी 

सुरुवातीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात असणारे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अखेरच्या क्षणी मात्र भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे संजयकाका समर्थक सदस्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपच्या पारड्यात मतदान टाकले. त्यामुळे संजयकाकांचे पुन्हा भाजपशी सलोख्याचे संबंध निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title : सांगली जि.प चुनाव: अजित पवार गुट में फूट; पाटिल समर्थकों ने भाजपा को वोट दिया।

Web Summary : सांगली जि.प चुनाव में एक मोड़ आया क्योंकि संजयकाका पाटिल के समर्थकों ने भाजपा के लिए मतदान किया, जिससे अजित पवार के गुट में विभाजन और राजनीतिक गठबंधनों में बदलाव का पता चला।

Web Title : Sangli ZP Election: Ajit Pawar faction split; Patil supporters vote BJP.

Web Summary : Sangli ZP election sees a twist as Sanjaykaka Patil's supporters voted for BJP, revealing a split in Ajit Pawar's faction and a shift in political alliances.