निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनावरून विश्वस्त, पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:32 IST2026-03-17T20:32:17+5:302026-03-17T20:32:27+5:30

आम्ही मंदिर परिरसराचे सर्वेक्षण करत आहोत, असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यातच दुपारच्या आरतीला पुजाऱ्यांनी गाभारा खुला केल्यावर दुबे यांनी प्रवेश केला

Trustees issue 'show cause' notice to police over Nishikant Dubey's Bhimashankar darshan, provincial authorities take action | निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनावरून विश्वस्त, पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनावरून विश्वस्त, पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

पुणे : श्री भीमाशंकरमंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम सुरू असल्याने दर्शनाला बंदी असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याप्रकरणी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी मंदिराचे विश्वस्त आणि पोलिस निरीक्षकांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सभामंडप आणि अन्य सुविधा देण्यासाठी बांधकाम सुरू आहे. त्यानुसार जानेवारीपासून मंदिरात जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली. महाशिवरात्रीच्या काळातही तेथे भाविकांना दर्शनासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली होती, असे असूनही दुबे यांनी दर्शन घेतल्याने जिल्हा प्रशासनावर टिकेची झोड उठली आहे.

या भागात दोन ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावले असतानाही दुबे यांची मोटार पहिल्या बॅरिकेडचा अडथळा पार करत पुढे नेण्यात आली. त्यांना मंदिरात भीमाशंकराचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि त्यांना प्रवेश दिला. या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना दिले होते. त्यानुसार दौंडे यांनी मंदिराचे विश्वस्त आणि पोलिसी निरीक्षकांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे.

असे घेतले दर्शन

दुबे शनिवारी दुपारी हेलिकॉप्टरने खेड येथे पोहोचले. त्याचे हेलिपॅड एका खासगी जागेत तयार करण्यात आले होते. ही जागा खासगी असल्याने त्यासाठी परवानगीची गरज नव्हती. महायुतीतील मित्रपक्षाच्या एका मोठ्या नेत्याने त्यांना मदत केली. तेथून मोटारीने ते भीमाशंकर येथे गेले. आम्ही मंदिर परिरसराचे सर्वेक्षण करत आहोत, असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यातच दुपारच्या आरतीला पुजाऱ्यांनी गाभारा खुला केल्यावर दुबे यांनी प्रवेश केला. पुजाऱ्यांनी त्यांना मज्जाव केल्यानंतरही त्यांनी दर्शन घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Trustees issue 'show cause' notice to police over Nishikant Dubey's Bhimashankar darshan, provincial authorities take action