शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे वर्षात हजार विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 17:11 IST

राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण विभाग: शाळांना काळजी घेण्याच्या सूचना

पुणे: दरवर्षी राज्यातील शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांचा अपघाताने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने वाहन अपघात, पाण्यात बुडून आणि साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहेत.त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी,याबाबतच्या सूचना प्राध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.राज्य शासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘ राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना ’ राबविली जात आहे. पूर्वी खासगी विमा कंपनी मार्फत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जात होती. परंतु, अपघातामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना २०११ पासून शासनाने स्वत: ७५ हजार रुपयांचा निधी देण्यास सुरूवात केली.तसेच अपघाताच्या तिव्रतेनुसार विद्यार्थ्यांना ५० ते ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शासनातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात १ हजार ६९ तर २०१८-१९ या वर्षात १,१९० अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. त्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर २० टक्के विद्यार्थ्यांना अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले.अपघातामुळे मृत्यू होणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने नुकतीच पुण्यातील गटशिक्षण अधिका-यांची बैठक घेतली. त्यात सर्व शाळांनी विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यावे,अशा सूचना करण्यात आल्या. यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सर्वत्र पाणी साठलेले आहे. तसेच शाळेच्या परिसरात गवत वाढले आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये व शाळा परिसरातील गवतामध्ये साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना पाण्याचे आकर्षण असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांमध्ये साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी परिसरातील गवत काढून टाकावे, अशा सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन्ही गेल्यामुळे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक डोळा किंवा हात निकामी झाल्यास विद्यार्थ्यांला ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. रस्त्यावरील अपघातामुळे मृत्यूमुखी पडणा-या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. रस्त्याचे नियम,पाणी,साप आदी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी,अशा सुचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीAccidentअपघात