युद्धामुळे आर्थिक दबाव कितपत खोलवर रुजला आहे याचे संकेत रशियाने अलीकडेच उचललेल्या पाऊलामुळे मिळतात. व्लादीमीर पुतिन यांच्या सरकारने २०२६ मध्ये आतापर्यत जवळपास २२ टन सोने विक्री केले आहे. जेणेकरून वाढत्या बजेटच्या नुकसानीतून सावरता येईल. युक्रेन युद्ध पाचव्या वर्षात पोहचत असताना संरक्षण खर्च, ऊर्जेचा खर्च आणि चलनावरील दबावामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान झाले आहे. या निर्णयामुळे ग्लोबल गोल्ड मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली असून गुंतवणूकदारांमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.
रशियातील सेंट्रल बँकेने २०२६ मध्ये आतापर्यंत २१.८ टन सोने विकले आहे. जे २२ हजार किलोग्राम इतके आहे. रशियाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा मार्च अखेरपर्यंत देशाची अर्थसंकल्पीय तूट ६१.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेनुसार १ एप्रिल २०२६ रोजी सोन्याचा साठा २,३०४.७६ टन होता, जो केवळ मार्च महिन्यातच ६.२२ टनांनी कमी झाला आहे. युक्रेनसोबत युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव आला आहे. एकीकडे सरकारी खर्च वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे रुबलवरील दबाव आणि महागाईमुळे परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे.
या परिस्थितीत देशांतर्गत सोन्याची मागणी वाढली आहे. मॉस्को एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये सोन्याच्या व्यापाराचे प्रमाण वार्षिक तुलनेत ३५०% पेक्षा जास्त वाढून ४२.६ टन झाले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर विक्रमी पातळीजवळ असल्याने सोन्याची विक्री होऊनही त्याचे एकूण मूल्य वाढले आहे. जानेवारीमध्ये दर प्रति औंस ५,५०० डॉलर्सच्या वर गेल्यानंतर रशियाने ३ लाख औंस सोन्याची विक्री करून अंदाजे १.४ ते १.६८ अब्ज डॉलर्स उभारले.
दरम्यान, रशिया एकमेव देश नाही तर अनेक मध्यवर्ती बँकांनी वाढता खर्च विशेषत: संरक्षण आणि ऊर्जा गरज भागवण्यासाठी सोन्याची विक्री केली आहे. दीर्घ काळावधीत रशियाने त्यांच्याकडील गोल्ड रिझर्व्ह मजबूत केले होते. २००२ ते २०२५ या काळात रशियाने १९०० टन सोने खरेदी केले होते परंतु २०२० नंतर खरेदीचा वेग मंदावला. चीनसोबत रशियाचा गोल्ड ट्रेडही वाढला. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत चीनला होणारी मौल्यवान धातूंची निर्यात जवळपास दुप्पट झाली. याशिवाय देशांतर्गत लोकांनी आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. रशियाने २०२४ मध्ये विक्रमी ७५.६ टन सोन्याची खरेदी केली.
Web Summary : Facing budget deficits due to the Ukraine war, Russia sold 22 tons of gold. Increased defense spending and currency pressures prompted this move, impacting global gold markets as domestic demand surged. Other central banks are also selling gold for expenses.
Web Summary : यूक्रेन युद्ध के कारण बजट घाटे का सामना कर रहे रूस ने 22 टन सोना बेचा। बढ़ते रक्षा खर्च और मुद्रा दबाव ने इस कदम को प्रेरित किया, जिससे वैश्विक सोने के बाजारों पर असर पड़ा क्योंकि घरेलू मांग बढ़ गई। अन्य केंद्रीय बैंक भी खर्चों के लिए सोना बेच रहे हैं।