Microsoft Voluntary Retirement: जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर ‘स्वैच्छिक निवृत्ती’ (Voluntary Retirement) ऑफर करत आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या सुमारे ७% कर्मचाऱ्यांना ही ऑफर मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकरकमी मोठी रक्कम देऊन स्वतःहून नोकरी सोडण्याचा पर्याय देत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ‘बायआउट’ (Buyout) ऑफर असू शकते.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?
ब्लूमबर्ग आणि सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, ही ऑफर अशा कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांचे वय आणि कंपनीत कामाची केलेली वर्षे मिळून ७० किंवा त्यापेक्षा जास्त होतात. उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याचं वय ५० वर्षे असेल आणि त्यानं मायक्रोसॉफ्टमध्ये २० वर्षे काम केलं असेल, तर तो या योजनेसाठी पात्र ठरेल. सुमारे ८,७५० कर्मचारी या कक्षेत येऊ शकतात. याला काही अपवादही आहेत. सेल्स इन्सेंटिव्ह प्लॅनवर काम करणाऱ्या काही विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलंय.
कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर एमी कोलमन यांनी सांगितले की, या प्रोग्रामचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या अटींवर पुढील पाऊल निवडण्याचा पर्याय देणं आणि त्यांना कंपनीकडून भक्कम पाठबळ मिळवून देणं हा आहे.
असा निर्णय घेण्यामागचे कारण काय?
मायक्रोसॉफ्टसारख्या श्रीमंत कंपनीला हा निर्णय घेण्याची गरज का पडली, त्यामागील मुख्य कारण म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची (AI) शर्यत. कंपनी सध्या एआय आणि डेटा सेंटर्स उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे. हे मोठे खर्च संतुलित करण्यासाठी कंपनी आपलं मनुष्यबळ आणि खर्च कमी करू इच्छितेय. कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून मिळणाऱ्या चांगल्या आर्थिक मदतीसह स्वतःच्या अटींवर निवृत्ती स्वीकारावी, असा कंपनीचा प्रयत्न आहे.
२०२३ पासून अनेकवेळा कपात
खर्च कमी करण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत. मायक्रोसॉफ्टनं २०२३ च्या सुरुवातीपासून अनेकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केलीये. याशिवाय ओरॅकल आणि मेटा प्लॅटफॉर्म्ससारख्या कंपन्यांनीही गेल्या वर्षी मोठ्या स्तरावर कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे.
Web Summary : Microsoft offers voluntary retirement with a lump sum to eligible employees, aiming to reduce costs amid AI investments. The offer targets those with combined age and tenure of 70 or more. This move follows previous layoffs by Microsoft and other tech giants.
Web Summary : माइक्रोसॉफ्ट एआई निवेश के बीच लागत कम करने के उद्देश्य से पात्र कर्मचारियों को एकमुश्त राशि के साथ स्वैच्छिक सेवानिवृत्ति की पेशकश कर रहा है. यह प्रस्ताव उन लोगों के लिए है जिनकी उम्र और कार्यकाल मिलाकर 70 या उससे अधिक है. यह कदम माइक्रोसॉफ्ट और अन्य तकनीकी दिग्गजों द्वारा पहले की गई छंटनी के बाद उठाया गया है.