शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 11:06 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

24 Apr, 26 11:17 AM

पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली आहे. एटीएसने त्यांच्याकडून ३२ बोरचे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. वाचा सविस्तर 

24 Apr, 26 11:06 AM

पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात सकाळपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. गुरुवारी दिवसभर पाणी येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल अशीही माहिती देण्यात आली होती. मात्र सकाळपासून अजिबातच पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. 
 

24 Apr, 26 11:06 AM

अवकाळी पाऊस, वादळामुळे सावंतवाडीत मोठं नुकसान, दीपक केसरकर यांनी केला पाहणी

अवकाळी पाऊस, वादळामुळे सावंतवाडीत मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अवकाळी पावसात नुकसान झालेल्या घटनास्थळावर शुक्रवार सकाळी आमदार दीपक केसरकर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले नगरसेवक अजय गोंदावले आदींनी भेट देऊन पाहणी केली तसेच लवकरात लवकर मदतकार्य पोचवले जाईल असे आश्वासन दिले.

 

24 Apr, 26 10:34 AM

पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसविरोधात आंदोलन

महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा पुण्यात आक्रमक झाला आहे. तसेच भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

24 Apr, 26 10:31 AM

मराठीला विरोध करणारे महाराष्ट्राचे शत्रू, संजय राऊतांचा घणाघात

मराठीला विरोध हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून होत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची आहे. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी आणि महाराष्ट्राचे शत्रू आहे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून इथे लोक कसं काय राहू शकतात. महाराष्ट्रात राजधानीत मुंबईमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले. 

24 Apr, 26 10:23 AM

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेसनं समर्थन दिलं आहे. तसंच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरेंना विधान परिषदेसाठी गळ घातल्याचं समजतं.

24 Apr, 26 10:23 AM

नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड

नाशिक - जिल्ह्यात भोंदू अशोक खरातचे कारनामे चर्चेत असतानाच महिला लैंगिक शोषणाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार गुरुवारी लासलगाव पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भोंदूबाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)

24 Apr, 26 10:21 AM

मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळून जखमी झाल्याची घटना मुंबईतील भांडुपमधील जनता मार्केट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर आठ जणांची प्रकृती स्थिर आहे. (सविस्तर वाचा)

24 Apr, 26 10:20 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मिशन विधानपरिषद'

विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला काही नावं पाठवल्याची माहिती आहे. डॉ. राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर, माजी आमदार प्रज्ञा सातव, राजा राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, माधव भांडारी, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्यासह २३ नावं पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहावं लागेल. 

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पElectionनिवडणूक 2026Narendra Modiनरेंद्र मोदीBaramatiबारामतीSunetra Pawarसुनेत्रा पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIPL 2026आयपीएल २०२६TCS Nashik CaseTCS नाशिक केसAshok Kharatअशोक खरात