Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:16 IST

काजोलने पहिल्यांदाच तिची 'नो किसींग पॉलिसी' ब्रेक केली. याचं कारण आता तिने नुकतंच सांगितलं.

अभिनेत्री काजोल गेल्या दोन दशकांपासून अभिनय करत आहे. ९० च्या दशकात 'कुछ कुछ होता है','कभी खुशी कभी गम','दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या रोमँटिक सिनेमांनी तिला ओळख मिळवून दिली. तर 'गुप्त'सारख्या सिनेमात ती खलनायिका होती. तेव्हापासून आजपर्यंत काजोल एकापेक्षा एक हिट सिनेमे देत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. 'द ट्रायल:प्यार, कानून धोखा' ही तिची सीरिज गाजली. या सीरिजमध्ये तिने किसींग सीन दिला. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये  काजोलने पहिल्यांदाच तिची 'नो किसींग पॉलिसी' ब्रेक केली. याचं कारण आता तिने नुकतंच सांगितलं.

लिली सिंहला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, "खरं सांगायचं तर माझी भूमिका सीरिजमध्ये मध्यवर्ती भूमिका होती. तो माझाच सीझन होता. माझ्या भूमिकेभोवती कहाणी फिरत होती. त्यामुळे तो सीन फक्त एक साधा किसींग सीन नव्हता तर त्यामागे भूमिकेचा विचार, त्या कॅरेक्टरचा विश्वास, ती काय मानते काय मानत नाही यावर तो सीन आधारित होता. संपूर्ण स्क्रीनप्लेचा तो महत्वाचा भाग होता. त्यामुळे मी तो सीन नाकारु शकत नव्हते."

ती पुढे म्हणाली, "मी नक्कीच थोडी अनकंफर्टेबल होते. सेटवर येईपर्यंत मी केवळ तोच विचार करत होते. मला स्क्रीप्ट वाचताना ते ठीक वाटत होतं पण मी हे खरोखर करु शकेन का यावर मला जरा शंकाच होती. सीन करताना मी 'कट, माझ्याकडून हे होणार नाही' असं म्हणेन की काय असं मला वाटत होतं. पण तो माझा प्रोफेशनल कॉल होता. मी हा निर्णय घेऊ शकते असं मला वाटलं."

काजोलला अभिनेत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांचा पश्चाताप होतो का? यावर काजोल म्हणाली, "मी अगदीच कमी वयात करिअरची सुरुवात केली. मला अभिनयच करायचा होता आणि मी त्याबद्दल प्रामाणिक होते. भले काही वेळा माझे निर्णय चुकले असतील पण नंतर मी त्याबद्दल जास्त विचार ककरतल नव्हते. मी फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचे."

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol Breaks 'No Kissing' Rule After Decades: Here's Why

Web Summary : Kajol, known for her romantic roles, broke her 'no kissing' policy in 'The Trial'. She explained the scene was crucial to her character's journey and the overall narrative, despite her initial discomfort. Kajol started acting early and focused on her work, even when decisions were tough.
टॅग्स :काजोलबॉलिवूडवेबसीरिज