शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:30 IST

मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेसाठी हिंदी-इंग्रजीसोबत मराठी भाषेचा समावेश करत प्रशासनाने सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेसाठी हिंदी-इंग्रजीसोबत मराठी भाषेचा समावेश करत प्रशासनाने सुधारित अधिसूचना जाहीर केली आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर मराठी अस्मितेला न्याय मिळाला असला तरी महाराष्ट्रात मराठी अपरिहार्य आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला योग्य सन्मान मिळायलाच हवा. पुन्हा अशी चूक करून मराठी तरुणांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी गुरुवारी मध्य रेल्वे प्रशासनाला दिला.

मध्य रेल्वेने १६ मार्च रोजी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. मात्र, यात हिंदी व इंग्रजी या भाषांचा समावेश करून मराठी भाषेला डावलल्याने संतापाची लाट उसळली होती. याविरोधात अमित यांनी रेल्वे प्रशासनास पत्र लिहून महाराष्ट्रात भरती प्रक्रिया होत असताना मराठी भाषेला डावलणे योग्य नसल्याचे सांगत प्रशासनाचा निषेध केला होता. त्यानंतर प्रशासनाने २२ एप्रिल रोजी नवी अधिसूचना जारी करत त्यात मराठीचा समावेश केला आहे.

रस्त्यावर उतरण्याची वाट पाहू नका

अमित यांनी सोशल माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही केवळ भाषेची नव्हे तर मराठी अस्मिता व हक्कासाठीची लढाई होती. हा आमचा नाहीतर स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा व मराठी अस्मितेचा विजय असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी अपरिहार्य असताना अशा चुका वारंवार होतातच कशा? प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करावा किंवा रस्त्यावर उतरावे लागेल याची वाट पाहू नका. स्वतःची जबाबदारी ओळखून प्रशासनाने मराठीचा समावेश आधीच करणे अपेक्षित आहे. भविष्यातही अशा भरती प्रक्रियेत मराठीचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Thackeray warns Central Railway: Marathi is mandatory in Maharashtra.

Web Summary : Following MNS pressure, Central Railway included Marathi in recruitment. Amit Thackeray warned against neglecting Marathi, emphasizing its importance and demanding respect for local rights.
टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाPoliticsराजकारण