Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:22 IST

Russia Gold Reserve: गेल्या काही वर्षांपासून भारत, चीन आणि पोलंडसारख्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या राखीव साठ्यात सोन्याचं प्रमाण वाढवलं आहे.

Russia Gold Reserve: गेल्या काही वर्षांपासून भारत, चीन आणि पोलंडसारख्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी आपल्या राखीव साठ्यात सोन्याचं प्रमाण वाढवलं आहे. सतत वाढता भू-राजकीय तणाव आणि ट्रेड वॉर सारख्या परिस्थितीमुळे आता चीनसारखे अनेक देश डॉलरवरील आपलं अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत.

देशांनी सोन्याची खरेदी वाढवण्यामागचं आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रशियाचे सुमारे ३०० बिलियन डॉलर अमेरिकेने गोठवले होते. अमेरिकेनं रशियासोबत जे केले, ते इतर देशांच्या बाबतीत घडू नये, या स्थितीपासून धडा घेऊन अनेक देश आपला सुवर्ण साठा वाढवत आहेत आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करत आहेत. रशियाची सोन्याची खरेदी ही त्यांच्या देशावरील आर्थिक दबाव कमी करण्याचा प्रयत्न आहे, तर इतर देशांची सोन्याची खरेदी ही आर्थिक मजबुती आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचे संकेत आहेत.

'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?

रशियाकडून सोन्याची मोठी विक्री

एकीकडे भारत, चीन आणि पोलंडसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था सोन्याचा साठा वाढवण्यासाठी सतत खरेदी करत आहेत, तर दुसरीकडे रशियाने केवळ २०२६ या वर्षातच २२,००० किलो सोनं विकलंय. ही स्थिती २०२५ पासून स्पष्टपणे दिसून येत आहे. रशियाकडे भारताच्या तुलनेत २.६ पट जास्त सोन्याचा साठा आहे. याव्यतिरिक्त, सोन्याचं उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीतही रशिया दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असतो.

रशिया सतत सोनं का विकतोय?

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला असून त्यांची अर्थसंकल्पीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी रशिया आपल्या साठ्यातून सतत सोनं काढून विकत आहे. पूर्वी रशिया केवळ कागदावर सोनं विकत असे, परंतु २०२५ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच 'फिजिकल गोल्ड' विकलं. पाहूया काय आहेत याची कारणं?

युद्धामुळे अर्थसंकल्पीय तूट वाढणं : युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाने सैन्यावर मोठा खर्च केला आहे. यामुळे २०२५ मध्येच त्यांची अर्थसंकल्पीय तूट अनेक पटींनी वाढली होती.

तेल आणि गॅसच्या कमाईवर परिणाम : रशिया पूर्वी तेल आणि गॅसद्वारे मोठी कमाई करत असे. मात्र, पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे ही कमाई जवळपास निम्मी झाली आहे. दरम्यान, मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे अमेरिकेने निर्बंधांमध्ये काही काळ शिथिलता दिली.

रुबलवर होणारा परिणाम : रशियाचं चलन 'रुबल' युद्धातील खर्चामुळे सतत कमकुवत होत आहे. चलन मजबूत करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी सरकार सोनं विकत आहे.

सोन्याचे वाढते दर : २९ जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींनी जो उच्चांक गाठला होता, त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत ही तेजी कायम होती. या दरवाढीचा रशियाने फायदा घेतला आणि महागड्या किमतीत सोनं विकलं.

एक महत्त्वाची बाब : रशिया सोनं विकत असला तरी, ते त्यांच्या देशातच विकलं जात आहे. रशिया आपल्या जनतेकडून जास्तीत जास्त 'रुबल' मिळवत आहे, जेणेकरून युद्धाच्या काळात शस्त्रं आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे चलनाची कमतरता भासू नये. म्हणजेच, देशातील बहुतेक सोनं देशांतर्गतच फिरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Countries increase gold reserves, learning from US actions against Russia.

Web Summary : Nations boost gold reserves, fearing US sanctions like those imposed on Russia. Russia sells gold to offset war costs, while others seek economic strength and reduced dollar dependence, fueled by geopolitical tensions.
टॅग्स :सोनंरशियाभारतअमेरिकायुक्रेन आणि रशिया