वडीगोद्री - ज्या घरात २ दिवसांपूर्वीच लग्नाच्या वाढदिवसाचा उत्साह होता, जिथे आनंदाचे वातावरण होते, तिथे आज काळाने घाला घातला आहे. नियतीचा खेळ इतका अजब ठरला की, लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करून अवघे ४८ तास उलटत नाहीत, तोच एका तरुण बँक कर्मचाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी धुळे-सोलापूर महामार्गावर घडली.
नितीन रमेश वाघमारे (वय ३२, रा. मधुबन कॉलनी, रेल्वे स्टेशन जवळ, जालना) असे मयताचे नाव आहे. नितीन वाघमारे हे शहागड येथील बुलढाणा अर्बन बँकेत कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास बँकेचे काम आटोपून ते आपल्या दुचाकीने जालनाकडे घराकडे परतत होते. धुळे सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथनगर जवळ आले असता, समोरून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोराची धडक बसली. या भीषण अपघातात नितीन वाघमारे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
नितीन वाघमारे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने वाघमारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नितीन वाघमारे यांचा विवाह २० एप्रिल २०२५ रोजी झाला होता. अवघ्या २ दिवसांपूर्वीच म्हणजे २० एप्रिल २०२६ रोजी त्यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. संसाराची नवी स्वप्ने उराशी बाळगून असतानाच तिसऱ्या दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या हातांवर आता सांत्वन करण्याची वेळ आल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : A young bank employee, Nitin Waghmare, died in a road accident near Gahininathnagar on the Dhule-Solapur highway. Just two days after celebrating his first wedding anniversary, Waghmare's motorcycle collided with a tractor while returning home from work in Shahagad. He is survived by his wife and family.
Web Summary : धुले-सोलापुर राजमार्ग पर गहिनीनाथनगर के पास सड़क दुर्घटना में युवा बैंक कर्मचारी नितिन वाघमारे की मौत हो गई। अपनी पहली शादी की सालगिरह मनाने के ठीक दो दिन बाद, शाहगढ़ में काम से घर लौटते समय वाघमारे की मोटरसाइकिल एक ट्रैक्टर से टकरा गई। उनके परिवार में पत्नी हैं।