By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:34 IST
1 / 10बॉलिवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संदीपा विर्क सध्या चर्चेत आहे. ६ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग (PMLA) प्रकरणात अडकलेल्या संदीपाने ४ महिने तिहार जेलमध्ये काढले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने एका मुलाखतीत जेलमधील भयंकर अनुभव शेअर केला आहे.2 / 10संदीपा म्हणाली की, जेलमध्ये जाण्यापूर्वीच समाज आणि यंत्रणा तुम्हाला गुन्हेगार मानू लागते. तिथे 'तपासणी'च्या नावाखाली जे काही घडतं, ते कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी पुरेसं आहे.3 / 10ज्योत्स्ना बेदी यांच्या पॉडकास्टमध्ये संदीपाने तिहार जेलमधील धक्कादायक वास्तव सांगितलं आहे, जे सहसा सर्वसामान्य लोकांच्या नजरेपासून लपलेलं असतं. 4 / 10अभिनेत्रीने सांगितलं की, 'जेलमध्ये जाताना होणारी तपासणी आणि प्रक्रिया इतकी अपमानजनक असते की माणसाला आपली सर्व प्रतिष्ठा गेल्यासारखं वाटतं. जेलमध्ये येणाऱ्या ज्या महिलांच्या ब्रेस्टचा आकार मोठा असतो, त्याची तपासणी केली जाते कारण काही लपवलं तर नाही ना हे पाहायचं असतं'5 / 10'अनेकांनी मला विचारलं की, जेलमध्ये तुझ्यासोबत काय घडलं हे तू का सांगतेयस? पण आता मी कोणालाही घाबरणार नाही. मी का सांगू नये? तिथे कर्तव्यावर असलेल्या काही मॅडम देखील खूप उद्धटपणे बोलतात.'6 / 10'काही चांगल्या असतात, पण बहुतेक जण खूपच उद्धट असतात. मी आयुष्यात खूप काही सहन करून आले आहे, यापेक्षा वाईट माझ्यासोबत आता काही होईल असं मला वाटत नाही.'7 / 10संदीपाने त्या क्षणांचीही आठवण काढली जेव्हा तिला तिच्या घरातून जेलमध्ये नेण्यात आलं होतं. अपमानजनक मेडिकल तपासणीतून जाणं आणि अनोळखी लोकांमध्ये असंवेदनशील वागणुकीचा सामना करणं किती कठीण होतं हे तिने सांगितलं. 8 / 10अभिनेत्री म्हणाली, 'मला माझ्या घरातून पकडून आधी दीन दयाळ हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे माझी प्रेग्नन्सी टेस्ट केली गेली. मला रात्रीच्या वेळी तिथे नेलं होतं.'9 / 10'डॉक्टर होण्यासाठी आलेली तरुण मुलं म्हणतात की, 'प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्या'. हे खूप लाजिरवाणं होतं. तुमच्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं जातं.'10 / 10अभिनेत्रीच्या मते, हा केवळ 'सिस्टम'चा प्रश्न नव्हता, तर हा स्वाभिमान गमावण्यासारखा प्रकार होता. न्याय मिळण्यापूर्वीच एखाद्याची ओळख गुन्हेगार म्हणून का ठरवली जाते? असा प्रश्न देखील संदीपाने विचारला आहे.