शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:35 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद उमटले आहे. भारतीय वंशाचे अमेरिकेतील डेमोक्रटिक पक्षाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी यावरून ट्रम्प यांना सुनावले. 

"डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल आणि अनिवासी परदेशी नागरिकांबद्दल केलेलं विधान हे वर्णभेदाला बळ देणारे आणि अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा घालवणार आहे", असा संताप डेमोक्रटिक पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख नरक असा केला होता. 

भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की, "डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा फक्त लाखो भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा आणि आपल्या सगळ्या महत्त्वाच्या जागतिक भागीदार देशाचा अपमान करणारी नाहीये, तर हे अमेरिकेच्या संधी आणि संशोधनाला चालना देणाऱ्या मुल्यांनाही कमकुवत करणारी आहे."

खासदार कृष्णमूर्तींनी काय दिला सल्ला?

खासदार कृष्णमूर्ती म्हणाले की, "अमेरिकेने भारतासोबतची भागीदार आणखी मजबूत केली पाहिजे. फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी दुफळी निर्माण होईल अशा गोष्टीला प्रोत्साहन न देता, आपल्या विविधतेचा आपल्या देशाने सन्मान केला पाहिजे."

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन हे पृथ्वीवरील नरक असल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भारत सरकारने या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, भारताचा सातत्याने अपमान केला जात आहे कारण पंतप्रधान घाबरलेले आहेत. कमकुवत आहेत आणि दबावाखाली आहेत. 

इराणचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

इराणने ट्रम्प यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. "ट्रम्प यांच्यासाठी कल्चर डिटॉक्स बूक करुन दिलं पाहिजे. कदाचित त्यामुळे त्यांची विनाकारणची बडबड थांबेल", असे इराणने म्हटले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's 'India is Hell' remark sparks outrage; Krishnamoorthi slams

Web Summary : Donald Trump's remark calling India 'hell' triggered condemnation. Indian-American Congressman Raja Krishnamoorthi criticized Trump's statement as racist and demeaning to India and Indian-Americans, urging stronger US-India ties. Iran also criticized Trump.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत