शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:19 IST

West Bengal Election 2026 voting percentage : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९२.८९% मतदान झाले आहे. मात्र, यादीतून ९०.८ लाख मतदारांची नावे वगळल्यामुळे हा बदल झाला आहे का?

पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या 'स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) मुळे बंगालमधील सुमारे ९०.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे एकूण मतदार संख्या ६.७५ कोटींवर आली असून, त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून येत आहे.

टक्केवारी का वाढली?यादीतील मृत, दुबार आणि स्थलांतरित अशा सुमारे १२% मतदारांची नावे हटवण्यात आली. यामुळे निवडणुकीच्य पहिल्या टप्प्यात आता केवळ ३.६१ कोटी मतदार उरले, ज्यापैकी ३.३५ कोटी लोकांनी मतदान केले. यामुळे मतदानाची टक्केवारी फुगून ९२.८% वर पोहोचली आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपया आकडेवारीवरून भाजप आणि टीएमसीमध्ये जुंपली आहे. "तृणमूलच्या भ्रष्टाचार आणि गुंडगिरीचा सूर्य मावळला आहे," असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे सत्तापरिवर्तनाचे संकेत असल्याचे 'X' वर नमूद केले. तर टीएमसीने आरोप केला आहे की, मुस्लिम बहुल भागातील नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली आहेत.

मतदार यादीतील कपातीचा सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे:

जिल्हामुस्लिम लोकसंख्याराजकीय स्थिती (२०२१)
मुर्शिदाबाद६६%२२ पैकी २० जागा (TMC)
मालदा५१%१२ पैकी ८ जागा (TMC)
उत्तर/दक्षिण २४ परगणा२६-३६%६४ पैकी ५७ जागा (TMC)

या चार जिल्ह्यांतूनच सुमारे १२.२ लाख नावे कमी करण्यात आली आहेत.

निकालावर काय परिणाम होणार?२०२१ मध्ये टीएमसीने भाजपपेक्षा ९.८७% अधिक मते मिळवून विजय मिळवला होता. यावेळेस वगळलेली ९०.८ लाख मते ही टीएमसीच्या विजयाच्या फरकापेक्षा थोडी जास्त आहेत. पश्चिम बर्धमान आणि दक्षिण दिनाजपूर सारख्या कमी फरकाने जिंकलेल्या जागांवर या कपातीचा मोठा परिणाम होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal's High Voter Turnout: 9 Million Names Removed, Percentage Rises?

Web Summary : West Bengal's high voter turnout sparks debate after electoral roll revisions removed 9 million names. TMC alleges targeted removal of Muslim voters, while BJP claims it signals a shift in power. The cuts significantly impact districts with large Muslim populations.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस