Iran Suggest Donald Trump To Visit Mumbai Maharashtra India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेतील एक कट्टर कार्यकर्ते माइकल सॅवेज यांचे वादग्रस्त विधान शेअर केल्याने वाद झाला. सॅवेज यांनी या पोस्टमध्ये भारत आणि चीनचा उल्लेख 'हेलहोल' (नरक) असा करत अमेरिकेत जन्म घेऊन तेथील नागरिकत्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर टीका केली आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकीकडे भारताने यावर प्रतिक्रिया दिली असून, इराणनेही भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प यांना खडेबोल सुनावले आहेत.
भारताच्या परराष्ट्र खात्याने अत्यंत सावध प्रतिक्रिया देत, 'आम्ही वृत्ते पाहिली आहेत, त्यापलीकडे भाष्य करायचे नाही,' असे म्हटले. तर भारतातील विरोधी पक्षांनी या विधानाचा 'भारत-विरोधी' असा निषेध करत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याकडे विरोध नोंदवावा, अशी मागणी केली आहे. यातच मुंबईतील इराणच्या दूतावासाने मुंबई आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणचे सौंदर्य दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, डोनाल्ड ट्रम्प यांना भारत फिरण्याचा सल्ला दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना मुंबई, महाराष्ट्र फिरायचा सल्ला
मुंबईतील इराण दूतावासाने १७ सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला असून, कुणीतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक सहल आयोजित करायला हवी. त्यामुळे तरी त्यांचे सांस्कृतिक शुद्धीकरण होऊ शकेल. कदाचित यामुळे त्यांची ती अस्ताव्यस्त बडबड थोडी कमी होईल. कधीतरी भारतात येऊन फिरा आणि मगच बोला, असा सल्लाच मुंबईतील इराणच्या अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'नरक' वक्तव्यावर निशाणा साधला आहे. पक्षाच्या प्रतिनिधींनी ट्रम्प यांच्यावर 'वंशवादी कचरा' पसरवल्याचा आरोप केला आहे. एका प्रतिनिधीने ट्विटरवर लिहिले की, अमेरिकन जनता संघर्ष करत आहे, आणि ते सोशल मीडियावर वंशवादी मूर्खपणा पसरवण्यात व्यस्त आहेत. ते अध्यक्षपद एखाद्या रिॲलिटी टीव्ही शोप्रमाणे चालवत आहेत. ही एक नाजूक वेळ आहे आणि आपल्या देशाला अधिक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.
Web Summary : Iran criticized Trump after he shared a post calling India a 'hellhole'. Iran's Mumbai consulate suggested Trump visit India to experience its culture, following Indian opposition's condemnation of Trump's remarks and a cautious response from the foreign ministry.
Web Summary : भारत को 'नरक' कहने पर ईरान ने ट्रंप की आलोचना की। मुंबई स्थित ईरानी दूतावास ने ट्रंप को भारत की संस्कृति का अनुभव करने के लिए यात्रा करने का सुझाव दिया। इससे पहले भारतीय विपक्ष ने ट्रंप की टिप्पणी की निंदा की थी।