शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:39 IST

Appraisal Meeting Job Loss: पगारवाढ मागण्यास गेलेल्या एका कर्मचाऱ्याला थेट राजीनामा दे, असे सांगण्यात आले. याव्यक्तीने त्याचा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. 

अनेक कंपन्या आणि संस्थांमध्ये पगारवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच एका व्यक्तीने त्याचा पगारवाढीसंदर्भातील धक्कादायक सगळ्यांना सांगितला आहे. आयटी कंपनीत असलेल्या या कर्मचाऱ्याने अप्रेजलच्या मीटिंगमध्ये पगारवाढ दिली जावी, असा मुद्दा मांडला. त्यावर कंपनीतील वरिष्ठांनी तू राजीनामा दे म्हणून सांगितले. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये टेक कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, मी अनेक महिन्यांपासून पगारवाढीचा वाट बघत होतो. अखेर पगारवाढीसंदर्भात बैठक झाली, तेव्हा मला वाटलं की, माझ्या पगारात वाढ होईल, पण बैठकीत मला राजीनामा देण्यास सांगितले आणि दुसरीकडे जॉब शोधण्यास सांगण्यात आले आहे. 

राजीनामा द्यायला का सांगण्यात आले?

कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, मी एका सेमीकंडक्टर कंपनीसाठी काम करतो. ती कंपनी माझ्या कंपनीला तितके पैसे देत नाहीये, जितका पगार मला कंपनीकडून दिला जात आहे. पगार आणि कंपनीकडून येणारे पैसे यातील फरक सांगण्यात आला. आता त्यांची इच्छा आहे की, मी राजीनामा द्यावा. 

पगारवाढ मागायला गेल्यानंतर मला राजीनामा द्यायला सांगितले जाणे हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मला राजीनामा द्यायचा नाहीये, पण चांगले पॅकेज कसे मिळवू शकतो, यासाठी मला सल्ला हवाय, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

लोकांचे वेगवेगळे सल्ले 

या पोस्टवर लोकांनी आपली मते मांडतांना त्याला वेगवेगळे सल्ले दिले आहेत. काहींनी म्हटले आहे की, स्वतःहून राजीनामा दिला, तर नुकसान होऊ शकते. त्याऐवजी कंपनीशी सगळे लेखी स्वरुपात बोल. काहींनी म्हटले आहे की, आधी नोकरीचा करार आणि त्यातील नियम व्यवस्थित समजून घे. एकाने म्हटले आहे की, कंपनीने स्वतःहून काढले तर जास्त पैसे मिळण्याची शक्यता जास्त असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sought a Raise, Lost the Job: Forced to Resign!

Web Summary : An IT employee, expecting a raise, was shockingly asked to resign during his appraisal meeting due to budget constraints. He seeks advice on securing a better package.
टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलjobनोकरी