By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:45 IST
1 / 10पश्चिम बंगालमध्ये सुमारे ९० लाख मतदारांची नावे वगळली गेली आहेत. हे मतदार याद्यांच्या सखोल तपासणी मोहिमेमुळे शक्य झाले आहे. यानंतर लगेचच महाराष्ट्रातही 'एसआयआर' (SIR) मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे रहिवासी आणि मतदार आहातच, परंतू तुमचे नाव या एसआयआरमध्ये असेलच असे नाही. एसआयआरमध्ये नाव असेल तर सुटलात, परंतू जर नसेल तर मात्र तुम्हाला धडपड करावी लागणार आहे. महाराष्ट्राची एसआयआर यादी ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. त्यात तुमचे नाव कसे तपासायचे ते आम्ही सांगणार आहोत. 2 / 10या प्रक्रियेमध्ये बीएलओ प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची माहिती, पत्ता आणि वयाची पडताळणी करत आहेत. बंगालमधील अनुभवानंतर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर नावांची कपात किंवा दुरुस्ती होण्याची शक्यता असल्याने मतदारांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.3 / 10मृत व्यक्ती, दुबार नावे आणि स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून वगळली जातील. ज्यांची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना नवीन नाव नोंदणीची संधी दिली जाणार आहे. 4 / 10जर तुम्हाला घरबसल्या तुमचे नाव तपासायचे असेल, तर खालील पद्धतींचा अवलंब करा:5 / 10सर्वप्रथम https://ecinet.eci.gov.in/homepage वेबसाईटवर जा किंवा ecinet हे मोबाईल अॅप डाईनलोड करा. 6 / 10वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला Voter Services च्या चौकोनावर क्लिक करायचे आहे. 7 / 10नंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला Special Intensive Revision (SIR) – 2026 असा डाव्या बाजुला पहिलाच रकाना दिसेल. त्यातील SIR 2026 - Search your name in last SIR वर क्लिक करा...8 / 10मग तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव मतदान केंद्र आदी निवडावे लागेल. पुढील सर्व माहिती भरण्याची गरज नाही. तुमचे आडनाव किंवा नाव-आडनाव जरी टाकले तरी चालेल. फक्त ही यादी २००२ ची असणार आहे. 9 / 10तुम्ही जर त्यापूर्वी मतदार झालेले असाल तर तुमचे नाव यात असणार आहे. नसल्यास तुमच्या आई-वडिलांचे नाव असणार आहे. यामुळे तुमचे नाव नसले तरी काळजी करू नका.10 / 10जेव्हा बीएलओ तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना आई-वडिलांच्या नावाची, मतदारसंघाची माहिती द्या. ते तुमचे २००२ नंतर बनलेल्या नव्या मतदारयादीतील नाव आई किंवा वडिलांच्या नावाला मॅप करतील. म्हणजे तुमचेही नाव एसआयआरमध्ये येईल.