उत्तर प्रदेशदहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर्स आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली आहे. एटीएसने त्यांच्याकडून ३२ बोरचे एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसं, एक चाकू आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर्स आयएसआयच्या सांगण्यावरून भारताची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धक्का पोहचवण्याचा कट रचत असल्याची माहिती त्यांना बऱ्याच काळापासून मिळत होती. या कटाअंतर्गत सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय तरुणांना टार्गेट करून स्लीपर सेल तयार करणं आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त केलं जात होतं.
पाकिस्तानी गँगस्टर्सच्या थेट संपर्कात
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी, आबिद जट आणि काही पाकिस्तानी युट्युबर्स, आयएसआयच्या सूचनेनुसार भारतीय तरुणांना धार्मिक कट्टरता आणि आर्थिक आमिष दाखवून त्यांचं ब्रेनवॉश करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. तरुणांकडून संवेदनशील ठिकाणांची रेकी करून घेणं, टार्गेटेड हल्ले करणं आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी हत्या करण्याची योजना आखली जात होती. या कटाच्या प्रभावाखाली येऊन बागपतचा रहिवासी तुषार चौहान उर्फ हिजबुल्ला अली खान आणि दिल्लीचा रहिवासी समीर खान हे पाकिस्तानी गँगस्टर्सच्या थेट संपर्कात आले होते आणि.
२३ एप्रिल रोजी अटक
एटीएसने ठोस पुराव्यांच्या आधारे २३ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही आरोपींना नोएडातून अटक केली. चौकशीदरम्यान तुषार उर्फ हिजबुल्लाने सांगितलं की, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शहजाद भट्टीच्या संपर्कात आला होता आणि त्याने त्याच्यासाठी विविध इन्स्टाग्राम आयडी देखील बनवले होते. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि व्हॉइस/व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्यांचं संभाषण सुरू झालं.
शहजाद भट्टीने आपल्याला काही लोकांच्या घरावर ग्रेनेड फेकण्याचं आणि टार्गेटेड हत्या करण्याचे आदेश दिल्याचे तुषारने कबूल केलं. या बदल्यात सुरुवातीला ५० हजार रुपये रोख आणि काम पूर्ण झाल्यावर २.५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आलं होतं. तसेच पासपोर्ट बनवून दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवण्याची योजना होती. आरोपींच्या म्हणण्यानुसार, आयएसआय एजंटनीच त्यांना पैसे आणि शस्त्रे पुरवली होती.
TTH लिहिणं आणि धमक्यांचा खुलासा
समीर खानला भिंतीवर 'TTH' (तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान) लिहिण्याचं आणि नवीन लोकांना आपल्यासोबत जोडण्याचं काम देण्यात आलं होतं, असंही चौकशीत समोर आलं आहे. दोन्ही आरोपी मिळून टार्गेटची रेकी करत होते आणि काही लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या, ज्यात पाकिस्तानी हँडलर्स कॉन्फरन्स कॉलवर जोडलेले असायचे.
Web Summary : ATS arrested two terrorists in Noida linked to Pakistani gangsters and ISI. They planned attacks, recruited Indian youth via social media, and received funds and weapons from ISI agents. The suspects were tasked with reconnaissance, threats, and writing 'TTH' on walls.
Web Summary : ATS ने नोएडा में पाकिस्तानी गैंगस्टरों और ISI से जुड़े दो आतंकवादियों को गिरफ्तार किया। वे हमलों की योजना बना रहे थे, सोशल मीडिया के माध्यम से भारतीय युवाओं की भर्ती कर रहे थे, और ISI एजेंटों से धन और हथियार प्राप्त कर रहे थे। संदिग्धों को रेकी, धमकी और दीवारों पर 'TTH' लिखने का काम सौंपा गया था।