Gold Silver Rate Today: भारतीय बाजारपेठेत शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या सत्राच्या तुलनेत चांदीचे दर १ टक्क्यांहून अधिक खाली आलेत. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अचानक वाढ, वाढते बॉण्ड यील्ड आणि मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर ही या घसरणीची मुख्य कारणं मानली जात आहेत.
MCX वर सोने आणि चांदीचे भाव
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचे दर १ टक्क्याने म्हणजेच २,३०० रुपयांहून अधिक घसरून २,३९,२०० रुपये प्रति किलोवर आले आहेत. तर, सोन्याची किंमत ०.४ टक्क्यानं म्हणजेच ६०० रुपयांहून अधिक कमी होऊन २,४१,५१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट सिल्वर ०.३ टक्क्यांनी घसरून ७५.२२ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती. तसंच स्पॉट गोल्ड ०.१ टक्क्याने घसरून ४,६८६.२९ डॉलर प्रति औंसवर आलं. या आठवड्यात आतापर्यंत सोन्याचे दर ३ टक्क्यांनी कमी झाले असून, यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेली दरवाढीची मालिका खंडित झाली आहे. अमेरिकन गोल्ड फ्युचर्स ०.५ टक्क्यांनी घसरून ४,७०२ डॉलरवर राहिले.
घसरणीची प्रमुख कारणं
कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका: ब्रेंट क्रूडच्या किमतीत या आठवड्यात १७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दर १०५ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेले आहेत. इराण युद्धविराम वाढवूनही होर्मुजची सामुद्रधुनी अजूनही मोठ्या प्रमाणावर बंद आहे, जो जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग आहे. यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता आहे, परिणामी व्याजदर दीर्घकाळ चढे राहू शकतात. याचा थेट फटका सोने-चांदीसारख्या विना-व्याज देणाऱ्या धातूंना बसत आहे.
डॉलर आणि बॉण्ड यील्डचा दबाव: अमेरिकन डॉलर या आठवड्यात ०.७ टक्क्यांनी मजबूत झाला आहे, ज्यामुळे इतर चलन धारकांसाठी सोने-चांदी महागली आहे. तसंच अमेरिकन १०-वर्षीय ट्रेजरी यील्ड २ टक्क्यांहून अधिक वाढल्यानं गुंतवणूकदारांचा कल बदललाय.
तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत भू-राजकीय परिस्थिती स्पष्ट होत नाही आणि तेलाच्या किमतींचा दबाव कायम राहतो, तोपर्यंत सोने-चांदीमध्ये अस्थिरता असू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे धातू अद्याप सुरक्षित मानल्या जात असल्या तरी, अल्पकालीन गुंतवणूकदारांनी सध्या सावध राहणं आवश्यक आहे.
Web Summary : Gold and silver prices fell sharply in Indian markets. Silver declined over 1%, impacted by rising crude oil prices, bond yields, and a strong dollar. MCX silver fell over ₹2,300 per kg, gold dropped over ₹600 per 10 grams. International markets also saw declines.
Web Summary : भारतीय बाजार में सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। कच्चे तेल की कीमतों में वृद्धि, बॉन्ड यील्ड और मजबूत डॉलर के कारण चांदी 1% से अधिक गिरी। एमसीएक्स चांदी ₹2,300 प्रति किलो से अधिक गिरी, सोना ₹600 प्रति 10 ग्राम से अधिक सस्ता हुआ। अंतर्राष्ट्रीय बाजारों में भी गिरावट।