MS Dhoni Fitness Updates after injury CSK IPL 2026: यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी अद्याप मैदानात उतरलेला नाही. धोनीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच, आता त्याच्या दुखापतीबाबत आणि पुनरागमनाच्या तारखेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ४४ वर्षीय धोनी सध्या 'काफ मसल' (Calf Muscle) म्हणजेच पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच्याबाबत चाहत्यांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
धोनीला काय दुखापत झालीये?
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचा हा हंगाम सुरू होण्यापूर्वी सराव सत्रादरम्यान धोनीला ही दुखापत झाली होती. स्नायू दुखावल्यामुळे त्याला धावताना त्रास होत आहे. सध्या तो नेट्समध्ये सराव करत असला तरी, विकेट्सच्या दरम्यान धावणे त्याला कठीण जात असल्याने त्याने आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये विश्रांती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघ व्यवस्थापनाने आणि फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी स्पष्ट केले आहे की, धोनी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय त्याला मैदानात उतरवण्याची जोखीम घेतली जाणार नाही.
धोनीच्या पुनरागमनाची तारीख कधी?
धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की, तो पुढच्या काही सामन्यांमध्ये पुनरागमन करू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात किंवा २ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात धोनी पुन्हा मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे. धोनीचे मैदानात असणे हे केवळ चेन्नईसाठीच नाही, तर संपूर्ण आयपीएलच्या लोकप्रियतेसाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
महेंद्रसिंह धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीने आतापर्यंत २७८ आयपीएल सामने खेळले असून ५४३९ धावा त्याच्या नावावर आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षीही त्याचा फिटनेस आणि खेळाप्रती असलेली ओढ पाहून सारेच थक्क आहेत. आता मुंबई किंवा गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनीचे दमदार पुनरागमन होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : MS Dhoni's participation in IPL 2026 remains uncertain due to a calf muscle injury sustained during practice. While he's practicing, running between wickets is difficult. A return is possible against Gujarat or Mumbai, pending full fitness. His presence is vital for CSK and IPL's popularity.
Web Summary : अभ्यास के दौरान पिंडली की मांसपेशियों में चोट लगने के कारण एमएस धोनी का आईपीएल 2026 में खेलना अनिश्चित है। अभ्यास करते समय, विकेटों के बीच दौड़ना मुश्किल है। पूरी तरह से ठीक होने पर गुजरात या मुंबई के खिलाफ वापसी संभव है। उनकी उपस्थिति सीएसके और आईपीएल की लोकप्रियता के लिए महत्वपूर्ण है।