शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:57 IST

Raghav Chadha career before politics : राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडला आहे. राजकारणात येण्यापूर्वी चड्ढा एक यशस्वी सीए होते आणि त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले होते. अण्णांच्या आंदोलनातून त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला?

आम आदमी पक्षाचे चाणक्य आणि अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे राघव चड्ढा यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठी आणि चड्ढा यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा आज अंत झाला. राघव चड्ढा यांनी केवळ पक्षाचा राजीनामाच दिला नाही, तर आपल्यासोबत इतर ८ खासदारांनाही भाजपच्या वाटेवर नेले आहे. राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी व्यावसायिक कारकीर्द गाजवणारे चड्ढा 'आप'चे सर्वात तरुण आणि प्रभावी चेहरे मानले जात होते.

२२ व्या वर्षी सीए आणि लंडनहून परतीचा प्रवासराजकारणात येण्यापूर्वी राघव चड्ढा हे एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया'मधून सीएची पदवी मिळवली. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी सीएचा परवाना मिळवला होता आणि इतक्या कमी वयात ते देशातील 'हाय टॅक्स पेयर' श्रेणीत आले होते. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले आणि 'डेलॉइट' व 'ग्रँट थॉर्नटन' यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले.

अण्णांच्या आंदोलनातून केजरीवाल यांच्याशी भेट२०१३ मध्ये जेव्हा अण्णा हजारे यांचे 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलन शेवटच्या टप्प्यात होते आणि अरविंद केजरीवाल रामलीला मैदानावर संघर्ष करत होते, तेव्हा राघव चड्ढा लंडनहून परतले होते. तिथेच त्यांची आणि केजरीवाल यांची भेट झाली. केजरीवाल यांनी त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना दिल्ली जनलोकपाल बिल ड्राफ्ट करणाऱ्या राहुल मेहरा यांना सहकार्य करण्याची पहिली जबाबदारी दिली.

'व्हॉलेंटियर' ते पक्षाचा सर्वात मोठा चेहराराघव चड्ढा यांचा 'आप'मधील प्रवास थक्क करणारा आहे. २०१३ चा पक्षाचा पहिला जाहीरनामा तयार करणाऱ्या टीममध्ये त्यांचा समावेश होता. काही काळ त्यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे आणि शांत स्वभावामुळे ते लवकरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये आम आदमी पक्षाची बाजू मांडणारा सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. केजरीवाल यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे चड्ढा आता त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे 'आप'साठी ही मोठी पोकळी ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raghav Chadha's Pre-Politics Life; AAP Loses Glamorous Face

Web Summary : Raghav Chadha, a trusted aide of Kejriwal, resigned from AAP, reportedly due to internal tensions, and is taking 8 MPs to BJP. A CA, he returned from London to join Kejriwal's anti-corruption movement and rose to be a prominent AAP leader.
टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाRaghav Chadhaराघव चड्ढा