By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:42 IST
1 / 6BMW F 450 GS: अॅडव्हेंचर बाईकप्रेमींसाठी BMW Motorrad ने आपली नवी BMW F 450 GS भारतात लॉन्च केली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही बाईक आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक फीचर्ससह सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त बाईक असेल.2 / 6नवीन BMW F 450 GS तीन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केली आहे. यात Base, Exclusive आणि Trophy अशा तीन व्हेरिएंट्सचा समावेश आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या बाईकची किंमत सुमारे ₹४.७ लाखांपासून ₹५.३ लाखांपर्यंत आहे.3 / 6बाईकचा Base आणि Exclusive व्हेरिएंट Cosmic Black कलरमध्ये मिळेल, तर Trophy व्हेरिएंट Racing Blue Metallic रंगासह येईल. Trophy व्हेरिएंटमध्ये व्हाईट टँक कव्हर फिनिश दिले असून, इतर व्हेरिएंट्समध्ये मॅट ब्लॅक फिनिश आहे.4 / 6या बाईकची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिचे नवीन इंजिन. कंपनीने यात नवीन ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे ४८ HP पॉवर @ ८,७५० rpm आणि ४३ Nm टॉर्क @ ६,७५० rpm देण्यास सक्षम आहे. पूर्वीच्या सिंगल-सिलेंडर इंजिनच्या तुलनेत हे इंजिन अधिक स्मूथ आणि शक्तिशाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाईक अधिक आरामदायक ठरते.5 / 6BMW F 450 GS मध्ये Shift Assistant Pro (क्लचशिवाय गिअर बदलण्याची सुविधा – Base मध्ये उपलब्ध नाही), Easy Ride Clutch (ट्रॅफिकमध्ये इंजिन बंद होऊ नये म्हणून मदत) सारखे अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, यात Rain, Road, Enduro आणि Enduro Pro (ऑफ-रोडिंगसाठी खास) असे ४ रायडिंग मोड्स मिळतात.6 / 6 ही बाईक TVS Motor Company सोबत भागीदारीत भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रीमियम ब्रँड असूनही किंमत तुलनेने स्पर्धात्मक ठेवण्यात आली आहे. या बाईकची भारतात रॉयल एनफिल्डच्या हिमालय, हिरो एक्सपल्स, KTM अॅडव्हेंचर390 आणि TVS अपाचे आरटीएक्स यांसारख्या अॅडव्हेंचर बाईक्सशी स्पर्धा असेल.