AAP : दिल्लीच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 'आम आदमी पक्षा'चे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, त्यांनी पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसोबत भाजपमध्ये विलीन होणार असल्याचे जाहीर केले आहे. या खासदारांमध्ये क्रिकेटर हरभजनसिंग, संदीप पाठक यांच्यासह ७ खासदारांचा समावेश आहे.
भाजपमध्ये विलिनीकरणाची घोषणा
राघव चड्ढा यांनी आज संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी घटनात्मक तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटल्याचा आरोप केला. चड्ढा म्हणाले की, ज्या पक्षासाठी मी १५ वर्षे मेहनत घेतली, तो आता आपल्या मूलभूत तत्त्वांपासून दूर गेला आहे. हा पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे.
भाजप नेतृत्वावर विश्वास
चड्ढा पुढे म्हणाले, राज्यसभेत 'आप'चे १० खासदार आहेत आणि त्यापैकी दोन-तृतीयांशहून अधिक खासदार या बाबतीत आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळीच आम्ही ते स्वाक्षरी केलेले पत्र व संबंधित कागदपत्रे राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहेत. मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव गेल्या काही वर्षांत होत होती. त्यामुळे आज मी पक्षापासून दूर होत असून जनतेच्या जवळ जात आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आम्ही आमचा राजकीय प्रवास पुढे नेताना देशासाठी काम करू, असेही सांगितले.
राघव चड्ढांसोबत कोणते खासदार आहेत?
- हरभजनसिंग
- स्वाती मालीवाल
- विक्रमजीत सिंह सहनी
- राजेंद्र गुप्ता
- संदीप पाठक
- अशोक मित्तल
राज्यसभेतील ‘आप’चे एकूण सदस्य
- राघव चड्ढा (पंजाब)
- संदीप पाठक (पंजाब)
- संजय सिंह (दिल्ली)
- अशोक मित्तल (पंजाब)
- हरभजन सिंग (पंजाब)
- विक्रमजीत सिंह साहनी (पंजाब)
- बलबीर सिंह सीचेवाल (पंजाब)
- स्वाती मालीवाल (दिल्ली)
- एन. डी. गुप्ता (दिल्ली)
- संजीव अरोरा (पंजाब)
Web Summary : A major political earthquake hits AAP as Raghav Chadha and seven Rajya Sabha MPs defect to BJP, citing deviation from core values and expressing faith in Modi's leadership.
Web Summary : राघव चड्ढा और सात राज्यसभा सांसदों के भाजपा में शामिल होने से आप में राजनीतिक भूचाल। मूल्यों से भटकाव और मोदी के नेतृत्व में विश्वास जताया।