नदिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा नवा अंक पाहायला मिळाला. नदिया जिल्ह्यातील कृष्णानगर येथे आयोजित ‘विजय संकल्प सभे’त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसवर तिखट शब्दांत निशाणा साधला. “झालमुडी मी खाल्ली, पण त्याची मिर्ची टीएमसीला लागली,” अशा शब्दांत त्यांनी ममता बॅनर्जींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
हिंसाचारावर भाष्य
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेमध्ये मोठा उत्साह असून मतदारांनी विक्रमी मतदान करावे. तसेच, निवडणूक आयोगाच्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या अनेक दशकांच्या तुलनेत यंदा बंगालमध्ये निवडणुकीतील हिंसाचार कमी झाला आहे, ही एक मोठे यश आहे.
रंगले राजकीय युद्ध
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी बंगाल दौऱ्यात रस्त्या कडेला बसून झालमुडीचा आस्वाद घेतला होता. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘हे सर्व आधीच ठरलेले नाटक असून केवळ दिखाव्यासाठी केले आहे’, असा आरोप केला होता. आजच्या सभेत मोदींनी याच मुद्द्यावरून पलटवार केला. मोदी म्हणाले की, “मी झालमुडी जरूर खाल्ली, पण त्याचे तिखट टीएमसीला लागल्याने त्यांची अस्वस्थता वाढत आहे. ४ मे रोजी निकाल लागतील, तेव्हा बंगालमध्ये मिठाईसोबत झालमुडीही वाटली जाईल.”
Web Summary : PM Modi countered Mamata Banerjee's criticism, stating his Jhalmuri consumption in Bengal caused TMC discomfort. He highlighted reduced election violence and anticipated celebratory Jhalmuri distribution post-election results.
Web Summary : पीएम मोदी ने ममता बनर्जी की आलोचना का जवाब देते हुए कहा कि बंगाल में उनके झालमुड़ी खाने से टीएमसी को बेचैनी हुई। उन्होंने चुनाव में कम हिंसा पर प्रकाश डाला और चुनाव परिणामों के बाद झालमुड़ी वितरण की उम्मीद जताई।