अमर शैलालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी विद्यापीठाने दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील कंत्राटी शिपाई सुदेश इंदप यांच्या विरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल केला. तसेच विद्यापीठाने त्याला बडतर्फ केले असून अन्य तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली. अभिषेक घाडीगावकर, विशाल परब आणि प्रवीण कोटियन अशी करणे दाखवा नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
इंदप याने प्रश्नपत्रिकेचा फोटो विद्यार्थ्यांना पाठविला. तसेच त्याबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी इंदप विरोधात आयटी ॲक्ट ६६ आणि पेपरफुटी प्रकरणातील कलमानुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, कोटियन याची नियुक्ती परीक्षा नियंत्रण कक्षातील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, तसेच संवेदनशील माहितीचे संरक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी केली होती. पण, नियमाचे उल्लंघन केले.
विद्यापीठाचे निर्देश काय?
कोटियन याने कामकाजाशी संबंधित नसलेल्यांना परीक्षा नियंत्रण कक्षात प्रवेश दिला. तर दोघांनी परीक्षा कामकाजाशी संबंधित नसताना परीक्षा नियंत्रण कक्षात प्रवेश केल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना पुढील सात दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले.
कसा आला प्रकार समोर?
- वांद्रेतील एमएमके कॉलेजमध्ये १५ एप्रिलला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स विषयाच्या परीक्षेपूर्वी जवळपास अर्धा तास आधी वॉशरूममध्ये एका विद्यार्थ्याकडे प्रश्नपत्रिका सापडली. या प्रश्नपत्रिकेवर सीडीओई केंद्राचा २७० क्रमांकाचा वॉटरमार्क होता.
- मात्र परीक्षेला काही वेळ शिल्लक असल्याने नक्की खरी प्रश्नपत्रिका आहे का याबाबत कॉलेज प्रशासनाला साशंकता होती. त्यांनी याची माहिती विद्यापीठाला दिली.
- विद्यापीठाने भरारी पथक पाठवून दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती कॉलेजमधील सूत्रांनी दिली. तसेच यासोबतच विद्यापीठाने नॅशनल कॉलेजमधून सहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी व्हॉट्सॲप ग्रुपवर पेपर फिरत असल्याचे आढळून आले.
शिक्षण क्षेत्रातून आक्षेप काय?
विद्यापीठाला परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजले होते. तसेच ही व्हॉटसॲप ग्रुपमधूनही प्रसारित झाल्याचे समोर आले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ दुसरी प्रश्नपत्रिका पाठविली नाही. त्याऐवजी फुटलेल्या प्रश्नपत्रिकेवरच परीक्षा घेतली, असा आक्षेप आता शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.
Web Summary : Mumbai University's TYBCom exam paper leak led to the arrest of a contract worker. Three others received show-cause notices for negligence. Investigations revealed unauthorized access and WhatsApp sharing of the leaked paper before the exam, raising concerns about the university's response.
Web Summary : मुंबई विश्वविद्यालय की टीवाईबीकॉम परीक्षा का पेपर लीक होने पर एक अनुबंध कर्मचारी को गिरफ्तार किया गया। लापरवाही के लिए तीन अन्य को कारण बताओ नोटिस जारी किए गए। जांच में परीक्षा से पहले अनधिकृत पहुंच और व्हाट्सएप पर लीक पेपर साझा करने का पता चला, जिससे विश्वविद्यालय की प्रतिक्रिया पर चिंता जताई गई।