By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:38 IST
1 / 9रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 2 / 9या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 3 / 9पण, लक्ष वेधून घेतलं ते राणी सईबाईंच्या भूमिकेत असलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनी जिनिलिया देशमुख हिने. 4 / 9'राजा शिवाजी'च्या ट्रेलरमध्ये जिनिलीयाची सईबाईंच्या भूमिकेतील झलक पाहायला मिळाली. जिनिलीयाला सईबाईंच्या लूकमध्ये पाहून चाहतेही थक्क झाले. 5 / 9नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर अन् डोळ्यांत छत्रपती शिवरायांसाठी प्रेम आणि आदराची भावना असलेल्या राणी सईबाईंची झलक ट्रेलरमध्ये दिसली.6 / 9सोशल मीडियावर जिनिलियाचं चाहते कौतुक करत आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये जिनिलीयाला सईबाईंच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 7 / 9जिनिलियाच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'जिनिलिया वहिनींची नजर काढा, सुंदर दिसत आहेत', 'जिनिलीयाला सईबाईंच्या भूमिकेत पाहणं म्हणजे सौंदर्य आणि शक्ती यांचा मिलाप...', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 8 / 9अमृता खानविलकरनेही जिनिलीयाच्या फोटोंवर कमेंट करत 'राणीसाहेब' असं म्हटलं आहे. 9 / 9'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून येत्या १ मे रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.