शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:25 IST

मायक्रोसॉफ्टने अशा मोठ्या प्रमाणावर स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नवी दिल्ली - टेक सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नोकर कपातीचं संकट उभं राहिले आहे. जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आता खर्च कमी करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने असे कठोर निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे अंदाजे २३,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. या निर्णयावरून तंत्रज्ञान कंपन्या झपाट्याने बदलणाऱ्या काळाशी कशा जुळवून घेत आहेत हे दिसून येते.

मेटाचं मोठं पाऊल

मेटानं आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका नोटमध्ये स्पष्ट केलंय की, ते कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १०% ने कमी करण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच अंदाजे ८,००० कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. शिवाय कंपनी सध्या ६,००० रिक्त पदे भरणार नाही. ही कर्मचारी कपात २० मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. कामकाज सुधारण्यासाठी आणि एआय (AI) सारख्या मोठ्या गुंतवणुकीचा खर्च संतुलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं कंपनीचे म्हणणे आहे. 

मायक्रोसॉफ्टची VRS ऑफर

दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने आपल्या अमेरिकन कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती योजनेचा (voluntary buyout) प्रस्ताव दिला आहे. कंपनीच्या अमेरिकन कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे ७% कर्मचारी या योजनेत समाविष्ट होऊ शकतात म्हणजेच अंदाजे ८,७५० लोकांना ही ऑफर मिळू शकते. मायक्रोसॉफ्टने अशा मोठ्या प्रमाणावर स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनी अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहे, ज्यांचे वय आणि सेवा कालावधी मिळून ७० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

एआयमध्ये मोठी गुंतवणूक बनलं कारण

दोन्ही कंपन्या सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (artificial intelligence) अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत. मायक्रोसॉफ्ट जगभरात नवीन डेटा सेंटर्स उभारत आहे आणि अलीकडेच जपान व ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मेटादेखील एआय (AI) प्रकल्प आणि भागीदारींवर विक्रमी रक्कम खर्च करण्याची तयारी करत आहे. परिणामी कंपन्या इतर खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करण्यासारखी पावले उचलत आहेत.

कर्मचाऱ्यांची चिंता वाढली

दरम्यान, सतत होणाऱ्या कर्मचारी कपातीच्या बातम्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेटाच्या अनेक विभागांमध्ये आधीच कर्मचारी कपात झाली आहे, ज्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. मेटा आणि मायक्रोसॉफ्ट दोन्ही कंपन्या २९ एप्रिल रोजी त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. गुंतवणूकदार आणि कर्मचारी कंपन्यांच्या पुढील पावलांवर लक्ष ठेवून असतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Tech Turmoil: Meta, Microsoft Plans Threaten 23,000 Jobs Amid AI Push

Web Summary : Meta and Microsoft are planning significant workforce reductions, potentially impacting 23,000 employees. This is driven by cost-cutting measures and substantial investments in artificial intelligence. Meta plans 10% staff reduction, while Microsoft offers voluntary buyouts, prioritizing AI investments amid employee anxiety.
टॅग्स :MetaमेटाMicrosoftमायक्रोसॉफ्ट