मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 08:07 IST2026-04-24T08:07:17+5:302026-04-24T08:07:43+5:30
Mumbai News: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळून जखमी झाल्याची घटना मुंबईतील भांडुपमधील जनता मार्केट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर आठ जणांची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळून जखमी झाल्याची घटना मुंबईतील भांडुपमधील जनता मार्केट परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर आठ जणांची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरुवातीला एक जण पहिल्या मजल्यावरून बेसमेंटमध्ये पडला. त्यानंतर या तरुणाला बाहेर काढण्यासाठी गेलेले आठ जण हेसुद्धा खाली कोसळले. ही दुर्घटना जिथे घडली त्याच्या बाजूलाच लग्नसमारंभ सुरू होता. दरम्यान, खाली पडून जखमी झालेल्यांमध्ये लग्नसमारंभातील सहा जणांचा आणि तीन कामगारांची समावेश आहे.
जनता मार्केट परिसरामध्ये असलेल्या एका हॉलमध्ये लग्न सुरू होतं. तिथे काही कारणांवरून तरुणांमध्ये भांडण झालं. त्यानंतर त्यातील काही मुलं बांधकाम सुरू असलेल्या परिसरात धाव गेली. तसेच त्यातील एक मुलगा पाण्याच्या टाकीवर ठेवलेल्या फळीवरून खाली पडला. तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलेही खाली पडली, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना बाहेर काढलं. खाली कोसळलेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. तर इतर आठ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.