सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:49 IST2026-04-24T09:46:21+5:302026-04-24T09:49:50+5:30
सीता नवमी २०२६: २५ एप्रिल २०२६ रोजी आपण 'सीता नवमी' साजरी करत आहोत. प्रभू श्रीरामांची शक्ती आणि त्यागाची मूर्ती असलेल्या माता सीतेचा हा जन्मोत्सव!

सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
भारतीय संस्कृतीत माता सीतेचे स्थान अत्यंत वरचे आहे. जेव्हा जेव्हा आदर्श स्त्रीत्वाचा उल्लेख होतो, तेव्हा सीतेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पण सीता म्हणजे केवळ दुःख सोसणारी स्त्री नाही, तर ती संकटातही डगमगून न जाणारी एक 'शक्ती' आहे. २५ एप्रिल रोजी सीता नवमी(Sita Navami 2026) आहे, थोडक्यात जाणून घेऊया सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा गुण!
हे ही वाचा : Peace of Mind: जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा भगवान बुद्धांचे 'हे' ५ विचार दाखवतील मनःशांतीचा मार्ग
१. 'सीता' नावाचा अर्थ आणि जन्मकथा
पौराणिक कथेनुसार, मिथिला नगरीचे राजा जनक एकदा यज्ञ करण्यासाठी जमीन नांगरत होते. त्यावेळी नांगराचे फाळ (ज्याला 'सीत' म्हणतात) एका सोन्याच्या पेटीला धडकले. त्या पेटीत एक अत्यंत तेजस्वी कन्या होती. भूमीतून प्रकट झाल्यामुळे तिचे नाव 'सीता' ठेवण्यात आले. वैशाख नवमीला हाच मंगलमय प्रसंग आपण 'सीता नवमी' म्हणून साजरा करतो.
२. सीता: धैर्याची आणि स्वाभिमानाची पराकाष्ठा
माता सीतेचे आयुष्य आव्हानांनी भरलेले होते. राजमहालातील सुख सोडून वनवास स्वीकारणे असो किंवा रावणाच्या बंदिवासात असताना दाखवलेला निग्रह असो; सीतेने कधीही आपला स्वाभिमान सोडला नाही. आजच्या काळातही, कामाच्या दडपणाखाली किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना 'धैर्य' कसं टिकवून ठेवायचं, हे आपल्याला सीतेच्या चरित्रातून शिकायला मिळतं.
हे ही वाचा : Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
३. सीता नवमीच्या दिवशी काय करावे?
पूजा विधी: या दिवशी सकाळी स्नान करून राम-सीतेच्या प्रतिमेची पूजा करावी. त्यांना पिवळी फुले आणि शृंगाराचे साहित्य अर्पण करणे शुभ मानले जाते.
वाचन: 'रामचरितमानस' किंवा 'सीता चालीसा'चे पठण करावे.
दानधर्म: भुकेलेल्यांना अन्नदान किंवा गरजू स्त्रियांना मदत करणे हे सीता मातेच्या पूजेचे प्रतीक मानले जाते.
हे ही वाचा : Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
४. या दिवसाचे महत्त्व
सीता नवमीला जे व्रत करतात, त्यांना सुख, समृद्धी आणि वैवाहिक जीवनात शांतता लाभते अशी श्रद्धा आहे. ज्यांना जीवनात वारंवार संघर्षाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी माता सीतेची भक्ती एक अदृश्य कवच बनून उभी राहते.