Peace of Mind: जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा भगवान बुद्धांचे 'हे' ५ विचार दाखवतील मनःशांतीचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:05 IST2026-04-24T07:00:10+5:302026-04-24T07:05:01+5:30
Peace Of Mind: बाहेरील गोंधळातही अंतर्मन शांत ठेवण्याची कला; जाणून घ्या भगवान बुद्धांचा मन:शांतीचा मंत्र!

Peace of Mind: जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा भगवान बुद्धांचे 'हे' ५ विचार दाखवतील मनःशांतीचा मार्ग
तणाव, घाई आणि प्रचंड दडपण असलेल्या आजच्या युगात मन शांत ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. मग ते ऑफिसचे काम असो किंवा आयुष्यातील अचानक आलेले संकट. अशा कठीण प्रसंगात स्वतःला स्थिर ठेवण्याचा मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला आहे, तो अनुसरण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.
हे ही वाचा : Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
जेव्हा सभोवताली गोंधळ असतो आणि कामाचे प्रचंड दडपण असते, तेव्हा आपली बुद्धी बधिर व्हायला लागते. सगळे प्रश्न आपल्याला घेरून उभे आहेत असे वाटून श्वास कोंडल्यासारखे वाटते. या चक्रव्यूहातून आपण बाहेर पडणारच नाही अशी भीती वाटते आणि या सगळ्या दडपणामुळे मन निराश, हताश होते. अशा वेळी भगवान बुद्ध यांनी सांगितलेले पाच नियम लक्षात ठेवा.
१. श्वासांच्या गतीवर लक्ष द्या
तणावप्रसंगी हृदयाची धडधड वाढते. जेव्हा आपले विचार आणि आपले श्वास यांची लय परस्परांशी जुळत नाही तेव्हा हाती घेतलेले प्रत्येक काम बिघडते. यासाठी भगवान बुद्धांनी श्वासावर लक्ष केंद्रित करण्याला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. जेव्हा तणाव वाढेल, तेव्हा सर्व कामे १ मिनिटासाठी थांबवा. दीर्घ श्वास घ्या आणि तो श्वास नाकावाटे आत जाताना आणि बाहेर येताना अनुभवा. श्वासावर लक्ष दिले की मन भविष्यातील चिंतेतून किंवा भूतकाळातील विचारांतून बाहेर येऊन 'वर्तमानात' स्थिरावते. श्वास आणि विचार एकाच गतीत येतात आणि कृतीला सुरुवात होते.
हे ही वाचा : Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
२. हे ही दिवस जातील!
बुद्धांच्या शिकवणीतील दुसरा मोलाचा संदेश म्हणजे 'अनिश्चितता'. जगात काहीही कायमस्वरूपी नाही. सुख नाही आणि दुःखही नाही. ज्याने ही गोष्ट मनावर बिंबवून घेतली त्या व्यक्तीला तणाव स्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळते. कारण ही तणावग्रस्त स्थिती कायमस्वरूपी नाही हे त्याला माहीत असते. अशा वेळी धीराने आहे त्या परिस्थितीकडे तटस्थपणे पाहणे गरजेचे असते आणि हा तणाव तात्पुरता आहे या जाणिवेने मन शांत राहते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या भीतीवर, चिंतेवर मात करू शकता.
३. 'प्रतिसाद' द्या, 'प्रतिक्रिया' नको (Respond, don't React)
दडपण आल्यावर आपण सहसा चिडचिड करतो किंवा घाबरतो (प्रतिक्रिया). बुद्ध म्हणतात, परिस्थिती आणि तुमची कृती यामध्ये थोडा 'विराम' (Gap) घ्या. दडपणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी १० पर्यंत आकडे मनात मोजा. हा छोटासा वेळ तुम्हाला परिस्थितीकडे तटस्थपणे पाहायला आणि 'प्रतिक्रिया' देण्याऐवजी शांतपणे 'प्रतिसाद' द्यायला मदत करतो. रागाच्या भरात वा आनंदाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. भगवान बुद्धांच्या या सूचनेनुसार वागल्यास त्या चुका टाळता येतात.
हे ही वाचा : Chanakya Niti: केवळ प्रेम पुरेसे नाही! चाणक्य नीतीनुसार खरा जोडीदार ओळखण्याचे 'हे' निकष महत्त्वाचे!
४. जे नियंत्रणात आहे, त्यावरच लक्ष द्या
अनेकदा आपण अशा गोष्टींची काळजी करतो ज्या आपल्या हातात नसतात. ज्या कदाचित घडणारही नसतात. मात्र त्या गोष्टींची काळजी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आपण त्याचाच विचार करतो. त्याऐवजी वर्तमानात जी स्थिती आहे, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष द्या. त्यामुळे तुमचा अर्ध्याहून अधिक ताण दूर होईल. मन शांत होईल. दडपण आल्यावर स्वतःला विचारा— "या क्षणी माझ्या हातात काय आहे?". जे तुमच्या नियंत्रणात नाही, त्याबद्दलची चिंता सोडून द्या आणि जे तुम्ही आत्ता करू शकता, तेच करा.
५. मध्यम मार्ग (The Middle Path)
अति-उत्साह किंवा अति-निराशा या दोन्ही गोष्टी तणाव वाढवतात. कामाच्या ठिकाणी स्वतःला झोकून देताना स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. समतोल राखणे म्हणजेच 'मध्यम मार्ग' अवलंबणे होय. रागाच्या किंवा चिंतेच्या भरात आपण टोकाचं पाऊल उचलतो. पण तसे न करता मध्य काढण्याचा नेहमी प्रयत्न करा आणि तो निघतो. त्यासाठी शांत डोक्याने परिस्थितीकडे बघा आणि मग कृती करा, तो मध्य तुम्हाला आपोआप दिसेल आणि मनावरचा ताण कमी होईल.
भगवान बुद्ध सांगतात, ''ज्याप्रमाणे महासागराच्या वरच्या थरात कितीही लाटा असल्या तरी तळ शांत असतो, तसेच आपले मन असायला हवे. तणाव हा बाहेरील जगाचा भाग आहे, पण तुमची शांती ही तुमची वैयक्तिक निवड आहे. भगवान बुद्धांच्या मार्गावर चालणे म्हणजे संन्यास घेणे नव्हे, तर संघर्षाच्या वेळीही स्वतःचे 'स्मरण' (Awareness) कायम ठेवणे होय.''