Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री

Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री

Stock Markets Today: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात हलक्या घसरणीसह झाली, त्यानंतर ही घसरण वाढताना दिसली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,२२१ वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:51 IST2026-04-24T09:51:48+5:302026-04-24T09:51:48+5:30

Stock Markets Today: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात हलक्या घसरणीसह झाली, त्यानंतर ही घसरण वाढताना दिसली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,२२१ वर व्यवहार करत होता.

Stock Markets Today starts with a decline Sensex down 400 points big sell off in Pharma IT shares | Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री

Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री

Stock Markets Today: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात हलक्या घसरणीसह झाली, त्यानंतर ही घसरण वाढताना दिसली. सकाळी ९:३० वाजता सेन्सेक्स ४४२ अंकांनी घसरून ७७,२२१ वर व्यवहार करत होता. याच काळात निफ्टी १३० अंकांनी घसरून २४,१०० च्या खाली घसरला होता. बँक निफ्टीमध्येही १६३ अंकांची घसरण झाली असून तो ५६,१५० च्या आसपास होता.

आयटी आणि फार्मा क्षेत्रात मोठी विक्री

ब्रॉडर मार्केटमध्ये सुरुवातीला हलकी खरेदी दिसून आली, परंतु नंतर तिथेही घसरण झाली. आयटी आणि फार्मा इंडेक्समध्ये सर्वाधिक विक्री पाहायला मिळाली. आयटी इंडेक्स १ टक्क्यांहून अधिक घसरला होता. दुसरीकडे, रियल्टी आणि ऑटो क्षेत्रात मात्र हलकी खरेदी दिसून आली. निफ्टी ५० मधील टॉप लूजर्समध्ये सिप्ला (Cipla), डॉ. रेड्डी (Dr Reddy), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS), सन फार्मा (Sun Pharma) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) यांचा समावेश होता. बाजार उघडल्यानंतर लगेचच निफ्टी ५० मधील एकही शेअर ग्रीन झोनमध्ये नव्हता.

पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?

जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाचा भडका

बाजारासाठी जागतिक संकेत संमिश्र आहेत. हॉर्मुजमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी आली आहे, तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची सततची विक्री बाजारावर दबाव निर्माण करत आहे. हॉर्मुज संकटामुळे कच्च्या तेलाचे दर सुमारे ४ टक्क्यांनी वधारून १०६ डॉलरच्या वर पोहोचले आहेत. 

सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवत कच्च्या तेलानं दोन आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. पुरवठ्याबाबत वाढलेली चिंता ही महागाई आणि बाजार या दोन्हीसाठी महत्त्वाचा संकेत आहे. दरम्यान, आज गुंतवणूकदारांचं लक्ष मोठ्या कंपन्यांचे निकाल आणि जागतिक घडामोडींवर असणार आहे.

Web Title : शेयर बाजार गिरावट के साथ खुला; सेंसेक्स 400 अंक नीचे, आईटी, फार्मा में बिकवाली।

Web Summary : भारतीय शेयर बाजार गिरावट के साथ खुला। सेंसेक्स 400 अंक गिरा, निफ्टी 24,100 से नीचे। आईटी और फार्मा क्षेत्र में भारी बिकवाली देखी गई। वैश्विक संकेतों और बढ़ते कच्चे तेल की कीमतों ने बाजार की धारणा को प्रभावित किया। निवेशकों की नजर कंपनी के नतीजों पर।

Web Title : Stock market opens lower; Sensex down 400 points, IT, Pharma sell-off.

Web Summary : Indian stock market started with a decline. Sensex fell by 400 points, Nifty below 24,100. IT and Pharma sectors witnessed heavy selling pressure. Global cues and rising crude oil prices impacted market sentiment. Investors eye company results.