आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:27 IST2026-04-24T07:18:35+5:302026-04-24T07:27:03+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - April 24, 2026, auspicious and fruitful day, there will be a favorable environment in work and business. | आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील

आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील

मेष - आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा

वृषभ  -  आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मिथुन  - आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. मित्र व हितचिंतकांचा सहवास घडेल.  आणखी वाचा 

कर्क  - मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा

सिंह - आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. आणखी वाचा

तूळ  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा 

वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील.  आणखी वाचा 

धनु - आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल.  आणखी वाचा 

मकर - दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. आणखी वाचा

कुंभ  - आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. आणखी वाचा 

मीन - आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. आणखी वाचा 

Open in app

Web Title : आज का राशिफल: 24 अप्रैल, 2026 - करियर, व्यवसाय के लिए शुभ दिन

Web Summary : आज कुछ राशियों के लिए मिलाजुला दिन है; कुछ को स्वास्थ्य संबंधी चिंताएँ, तो कुछ को पारिवारिक सुख और वित्तीय लाभ मिलेगा। करियर में सफलता, कुछ राशियों के लिए विवाद की संभावना।

Web Title : Horoscope Today: April 24, 2026 - Auspicious Day for Career, Business

Web Summary : Mixed day for signs; some face health concerns, others enjoy family time and financial gains. Success in career, potential disputes for some signs.